Maharashtra247

फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील युवा नेते सोमा शिंदे यांचे अल्पशा आजाराने निधन

अहमदनगर (दि.२० एप्रिल):-फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील युवा नेते लोकशाही विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सोमा भाऊ शिंदे यांचे वयाच्या (३४) व्या वर्षी अल्पशा आजाराने पुणे येथे निधन झाले आहे.

त्यांच्यावर शहरातील अमरधाम येथे बौद्ध धम्म पद्धतीने शांत वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील दोन बहिणी असा परिवार होता.यावेळी शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील व विविध सामाजिक क्षेत्रातील मित्रपरिवार उपस्थित होता.त्यांच्या निधनाबद्दल उपनगरात हळहळ व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page