श्रीरामपुरात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे छापे लाखोंचा मुद्देमाल नष्ट…
अहमदनगर (दि.२० एप्रिल):-लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.२ श्रीरामपूर यांनी श्रीरामपूर तालुक्यातील गोंधवणी,रवाडा या ठिकाणी गावठी हातभट्टी दारू निर्मिती केंद्रावर कारवाई करत तब्बल ५ गुन्हे दाखल करत १८०७० लि.कच्चे रसायन व १६२३ ली. गावठी हातभट्टी दारू निर्मितीचे लोखंडी व प्लास्टिक बॅरल नष्ट केले आहे.
या मुद्देमालाची एकूण किंमत ९ लाख ४७ हजार ७७५ रू.इतकी आहे.अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मिती व विक्री ठिकाणी अवैध ढाबे यावर सातत्याने कारवाई केली जाणार असल्याची माहिती श्री.अनुपकुमार देशमाने भरारी पथक क्रमांक २ श्रीरामपूर विभाग यांनी दिली आहे.हि कारवाई श्री.डॉ.विजय सूर्यवंशी आयुक्त राज्य उत्पादन शुल्क म.रा मुंबई,श्री. सागर धोमकर विभागीय उपआयुक्त राज्य उत्पादन शुल्क,श्री.प्रमोद सोनोने अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर,श्री.प्रवीण कुमार तेली उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली श्री. अनुपकुमार देशमाने निरीक्षक भरारी पथक क्र.२ श्रीरामपुर, श्रीएस.एस.हांडे निरीक्षक कोपरगाव विभाग,श्री.एस.ए.जाघव निरीक्षक श्रीरामपूर विभाग, श्री.एस.के.सहत्रबुद्धे संगमनेर विभाग,श्री. जी.एन.नायकोडी दुय्यम निरीक्षक,श्री.एन. बी.पालवे दुय्यम निरीक्षक भरारी पथक क्र.२ श्रीरामपूर,श्री.वाय. बी.पाटील दुय्यम निरीक्षक,श्री.सी.एस. रासकर दुव्यम निरीक्षक,श्री. आर.टी.ढावरे दुय्यम निरीक्षक,श्री.आर.ए.घोरपडे,श्री.रायचंद गायकवाड दुय्यम निरीक्षक,श्री.दिवाकर वाघ दुय्यम निरीक्षक,कु. प्राची देखणे दुय्यम निरीक्षक,श्री.के.के.शेख सहा.दुय्यम निरीक्षक,श्री. एस.डी.साठे सहा.दूय्यम निरीक्षक,श्री.के.के.शेख सहा.दुव्यम निरीक्षक, श्री.टी.आर.शेख जवान,श्री.एन.आर ठोकळ,श्री शुभम लवांडे व महिला जवान श्रीमती एस.आर.फटांगरे, श्रीमती.वर्षा जाधव,श्रीमती.पूनम आर,श्री. एन.एम.शेख,श्री.संपत बिटके,श्री.सुशांत कासुळे,श्री.विजय पाटोळे जवान नि वाहन चालक यांनी केली आहे.