
अहमदनगर (दि.२० एप्रिल):-जिल्ह्यातील बालविवाह रोखण्यासाठी उडान प्रकल्पाच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे.

जिल्हा महिला व बाल विकास विभाग,जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बाल कल्याण समिती,स्थानिक पातळीवर बालविवाह प्रतिबंधक यंत्रणा यांच्या संयुक्त कर्यावतून उडान प्रकल्पा अंतर्गत धडक मोहीम राबवण्यात येणार आहे.या मोहिमेंतंर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये पुढील काळात ग्राम बाल संरक्षण समिती,महिला बचत गट,अंगणवाडी सेविका,उमेद प्रकल्पाच्या CRP, आणि समाजातील कर्तव्यशील नागरिक, नोकरदार लोकप्रतिनिधी,वकील, डॉक्टर, शिक्षक, पत्रकार, समाजकार्याची आवड असणारे शेतकरी-कष्टकरी संवेदनशील तरुणाई असे सर्व उडान बालविवाह प्रतिबंधक अभियानातील वरील सर्व स्वयंसेवक यांच्या माध्यमातून बालविवाह प्रतिबंधक कायदा विषयी आणि बाल हक्क व अधिकार विषयी जनजागृती करण्यात येणार आहे.
या अनुषंगाने नगर तालुक्यातील वाळकी गावातील आज दि.20 जानेवारी 2024 रोजी येथील उमेद प्रकल्प आणि उडान यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि बालकांचे अधिकार तसेच अल्पवयीन मुलीची असुरक्षता या विषयावर महिला वर्गासाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी उडान प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम सर यांनी महिलांना बालविवाह विषयी होणारे नुकसान नजरेस आणून दिले.तसेच अठरा वर्षाखालील मुलींना बालविवाह झाल्यानंतर येणाऱ्या अडीअडचणींना सामोरे कसे जातात याविषयी माहिती दिली.
तसेच बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 याविषयी देखील माहिती दिली. शासकीय योजना बदल सुद्धा माहिती देण्यात आली. या मध्ये प्रामुख्याने बाल संगोपन योजने विषयी देखील माहिती दिली. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती ग्रामसभा अध्यक्ष मनीषा कासार,योगिता हजारे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन CRP गटप्रमुख शितल दळवी, तसेच सर्व उपस्थित असणाऱ्या महिलांनी उडान प्रकल्पातील पदाधिकाऱ्यांचे यांचे आभार मानले.हा कार्यक्रम उडान प्रकल्पाचे मानद संचालक ॲड. बागेश्री जरंडीकर, स्नेहालय चे अनिवासी प्रकल्प विभागाचे संचालक श्री. हनीफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उडान प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रविण कदम, सामाजिक कार्यकर्ते शहीद शेख, शशिकांत शिंदे, पूजा झीने, सीमा जुनी, CRP गटप्रमुख शितल दळवी, अनुजा डोंगरे यांनी विशेष परिश्रम घेतले.