घरफोडी व जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
अहमदनगर (दि.२१ एप्रिल):-श्रीगोंदा येथील घरफोडी व जबरी चोरीच्या गुन्ह्यातील 2 सराईत आरोपीना मुद्देमालासह जेरबंद करून 2 गुन्ह्यांची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.
बातमीची हकिगत अशी की यातील फिर्यादी श्री.सत्यवान भागचंद कळमकर रा.कामठी,ता. श्रीगोंदा) यांचे घराचे कुलूप अनोळखी इसमाने उघडुन आत प्रवेश करुन घरातील 1 लाख 50,000/-रुपये किंमतीचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेले बाबत श्रीगोंदा पो.स्टे.गु.र.नं. 420/2024 भादविक 457,380 प्रमाणे घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री. दिनेश आहेर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची पथके नेमून ना उघड गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन गुन्हे उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री.आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमुण ना उघड गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन गुन्हे उघडकिस आणणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.पथक श्रीगोंदा परिसरात फिरुन रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेत असताना पथकास वरील प्रमाणे दाखल घरफोडीचा गुन्हा हा आरोपी नामे स्वप्नील भोसले (रा.पारोडी,ता. आष्टी,जिल्हा बीड) याने त्याचे इतर साथीदारांसह केला असुन तो त्याचे एका साथीदारासह श्रीगोंदा ते साळनदेवी जाणारे रोडवर बसस्टॅण्ड जवळ चोरीचे सोने विकण्यासाठी येणार आहे अशी गुप्तबातमीदारा मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली.पथकाने लागलीच बातमीतील नमुद ठिकाणी जावुन सापळा लावुन थांबलेले असताना बातमीतील वर्णना प्रमाणे 2 संशयीत इसम बस स्टॅण्डकडुन येवुन साळनदेवी जाणारे रोडवर संशयीतरित्या थांबले.त्यावेळी पथकाची खात्री झाल्याने संशयीतांना चोहोबाजुंनी घेरुन ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयीतांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे स्वप्नील श्रीराम भोसले व विशाल कल्याण भोसले दोन्ही (रा.पारोडी,ता. आष्टी,जिल्हा बीड) असे सांगितले.त्यांची पंचा समक्ष अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीत सोन्याचे दागिने मिळुन आले.
नमुद दागिन्या बाबत विचारपुस करता आरोपी नामे स्वप्नील भोसले याने जानेवारी महिन्यात साथीदार नामे सोमनाथ दिलीप काळे (फरार) रा.घुमरी,ता. कर्जत,सलीम नारायण भोसले (फरार) रा. वायरा,ता.आष्टी,जिल्हा बीड यांचे सह कोकणगांव रोडने जाणा-या महिलेच्या गळ्यामधुन सोन्याचे मंगळसुत्र चोरी केल्याचे तसचे 7-8 दिवसांपुर्वी साथीदार नामे विशाल कल्याण भोसले,सलीम नारायण भोसले (फरार) रा.वायरा,ता.आष्टी, जिल्हा बीड व हमशक ऊर्फ आमशु दिलीप काळे (फरार) रा.घुमरी, ता. कर्जत यांचेसह कामठी,ता.श्रीगोंदा येथुन रात्रीचे वेळी घरफोडी करुन सोन्याचे दागिने चोरी केल्याचे सांगितले.आरोपीने सांगितलेल्या हकिगती प्रमाणे स्थागुशा पथकाने अहमदनगर जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी करता श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे 1) गु.र.नं. 18/24 भादविक 392, 34 व 2) गु.र.नं. 420/24 भादविक 457, 380 प्रमाणे 2 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असुन ते उघडकिस आलेले आहेत.ताब्यातील आरोपींचे कब्जात 60,000/-रुपये किंमतीचे 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र, 30,000/- रुपये किंमतीचे 5 ग्रॅम वजनाचे कानातील वेल, 30,000/- रुपये किंमतीचे 5 ग्रॅम वजनाची बोरमाळ व 3,000/-रुपये किंमतीची अर्धा ग्रॅम वजनाची सोन्याची नथ असा एकुण 1,23,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने दोन्ही आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेवुन श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.
पुढील तपास श्रीगोंदा पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.विवेकानंद वाखारे उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार बबन मखरे,दत्तात्रय हिंगडे, रविंद्र कर्डीले,देवेंद्र शेलार,भिमराज खर्से, संदीप दरंदले,संतोष खैरे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर,रोहित मिसाळ,जालिंदर माने, विशाल तनपुरे,बाळु गुंजाळ,मेघराज कोल्हे व संभाजी कोतकर यांनी केली आहे.