
कोपरगाव प्रतिनिधी:-अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर तब्बल अडीच वर्षे अत्याचार करणाऱ्या इसमाविरुद्ध कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातमीची हकीकत अशी की,कोपरगाव शहरात ब्युटी पार्लर सुरू करण्यासाठी महिलेने सुनील देवकर (रा. टाकळी,ता.कोपरगाव) इसमा कडून पाच लाख रुपये उसने घेतले होते. त्याचा गैरफायदा आरोपी सुनील घेत होता.त्याने पार्लरमध्ये छुपा कॅमेरा बसवून महिलेचे अश्लील फोटो काढले.व हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन ऑगस्ट २०२२ पासून तिच्या सोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवत होता.पार्लरमध्ये,नाशिक रोडवरील लॉजवर तसेच त्याच्या ऑफिसमध्ये, अशा वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केला.
त्यास महिलेने विरोध केला तेव्हा सुनील देवकर याने तिला जिवे मारण्याची धमकी दिली.या सर्व गोष्टीला कंटाळून संबंधित महिलेने कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात २० एप्रिल रोजी रात्री फिर्याद दिली.या फिर्यादीवरून पोलिसांनी सुनील देवकर विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा करीत आहेत.अशा घटनांमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा महिला संरक्षणाचा प्रश्न निर्माण आला आहे.