
अहमदनगर (दि.२२ एप्रिल):-अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून पुन्हा एकदा विद्यमान खासदार सुजय विखे यांना उमेदवारी देण्यात आली.सुजय विखे आज हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी भव्य रॅलीच्या माध्यमातून सुजय विखे यांच्या कडून अहमदनगर शहरामध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले.यावेळी कार्यकर्त्यांनी खा.सुजय विखे आणि आ.संग्राम जगताप यांना आपल्या खांद्यावर उचलून घेतले होते.अहमदनगरच्या माळीवाडा बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला सुरुवात झाली आहे. माळीवाडा ते नवीपेठ मार्गे रॅली,दिल्लीगेट पर्यंत ही रॅली जाणार असून चितळे रोड येथे येथे सभा पार पडणार आहे.या रॅलीमध्ये महिला वर्गाची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.