Maharashtra247

गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगणारा जेरबंद भिंगार कॅम्प पोलिसांची धडक कारवाई

अहमदनगर (दि.२६ एप्रिल):-लोकसभेच्या अनुषंगाने पोलिसांच्या कारवाईत गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगणारा आरोपी भिंगार कॅम्प पोलीसांनी जेरबंद केला आहे.

दि.२५ एप्रिल रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम हा त्याचे कंबरेला गावठी कटटा (अग्नीशस्त्र) लावुन बु-हाणनगर रोडवरील दमडी मशिद जवळ संशयास्पद फिरत आहे. अशी माहिती प्राप्त झाल्याने त्यांनी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील अंमलदारांना तात्काळ सदर ठिकाणी जावुन स्वताची सुरक्षितता बाळगुन प्राप्त माहिती आधारे सदर ठिकाणी दोन प्रतिष्ठीत पंचांना घेवुन जावुन खात्री करुन व काही आक्षेपार्ह मिळुन आल्यास त्याचेवर कारवाई करा असा तोंडी आदेश दिल्याने गुन्हे शोध पथकातील अंमलदारांनी सदर ठिकाणी जावुन दमडी मशिदजवळ जावुन पाहणी केली.

तेथे एक इसम संशयास्पद फिरतांना दिसुन आल्याने पंचांची व पोलीसांची खात्री होताच त्यास जागीच ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीत कंबरेला खोसलेला एक २५,२००-रु.किं.चा लोखंडी पिस्टल मॅगजिन गावठी बनावटीचा कटटा (अग्नीशस्त्र) व दोन जिवंत काडतुस असे आरोपी जाबीर सादिक सय्यद (रा.घर नं.-६ शहा कॉलनी,गोविंदपुरा, अहमदनगर) याच्या कब्जात मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचे विरोधात भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे पोकॉ/संदिप थोरात यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा रजिस्टर नंबर ४४३/२०२४ आर्म अॅक्ट ३/२५ सह महा.पो.का.क.३७ (१) (३) प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्हयाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक/अतुल बोरसे हे करत आहेत.सदरची कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक योगेश राजगुरु,पोलीस अंमलदार रेवणनाथ दहिफळे,कैलास सोनार, संदिप घोडके,दिपक शिंदे,संदीप थोरात,कैलास शिरसाट,रवींद्र टकले यांनी केली आहे.

You cannot copy content of this page