राजकीय दबावातून निलेश लंकेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याचे मोठे षडयंत्र काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांचा आरोप
नगर प्रतिनिधि:-नगर दक्षिण लोकसभेत अत्यंत चुरशीची लढत होत असून त्यातच काल कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये रात्री उशिरा हाय व्होल्टेज नाट्य पाहायला मिळाले.महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यावर शहरातील एका खाजगी हॉटेलवर धाड मारून ताब्यात घेण्यात आले होते.
ही घटना समजताच शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गर्दी केली. यावेळी शहराचे डीवायएसपी अमोल भारती आणि किरण काळे यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली.यामुळे तेथील वातावरण काही वेळ तणावपूर्ण झाले होते. यावेळी भारती यांनी काळे यांना अटक करा असे फर्मान सोडले.
त्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते संतापले.काळे यांनी कोतवाली पोलीस निरीक्षकांच्या दालनातच जमिनीवर बैठक मांडून मी कोणताही गुन्हा केलेला नाही.पण खोटा गुन्हा दाखल करून जर मला अटक करायची असेल तर मी त्या संघर्षाला सामोरे जायला तयार आहे.मात्र हे हुकूमशाही वागणे संविधान विरोधी आहे. हा सत्तेचा गैरवापर आहे. आम्ही त्याचा निषेध करतो असे म्हणत डीवायएसपी भारती यांना चांगलेच धारेवर धरले.