२ मे रोजी नायगांव येथे बिरोबा महाराजांची यात्रा
श्रीरामपूर (प्रतिनिधी):-श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री.बिरोबा महाराज यात्रोत्सवास गुरुवार दि.०२ मे रोजी प्रारंभ होणार आहे.
या यात्रेनिमित्त सकाळी काठी मिरवणूक काढण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान राशिनकर वस्ती येथील बिरोबा महाराज यात्रा उत्सव होईल त्यानंतर महाप्रसादाचा भव्य असा कार्यक्रम होईल.
सायंकाळी वीरभद्र मंदिर जुने नायगाव येथे वर्षानुवर्ष चालत आलेली बारा गाड्यांची परंपरा बिरदेव राशिनकर भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडते.तरी या यात्रोत्सवाचा भाविकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन बिरोबा यात्रा उत्सव कमिटी यांच्या वतीने करण्यात आले आहे..