वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांची शनिवारी नगरमध्ये जाहीर सभा
अहमदनगर (२ एप्रिल):-अहमदनगर दक्षिण व शिर्डी लोकसभा मतदारसंघात चुरस वाढतच चालली आहे.त्यातच विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांची शनिवारी अहमदनगर येथे एन आर लॉन छत्रपती संभाजी नगर रोड वसंत टेकडी शेजारी येथे जाहीर सभा होणार आहे.हि सभा शनिवारी दि.४ मे रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.
ओबीसी वंचित बहुजन पार्टीचे अधिकृत उमेदवार दिलीप कोंडीबा खेडकर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर सभा आयोजित केली आहे.या सभेस राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण,राज्य उपाध्यक्ष दिशा पिंकी शेख,राज्य समन्वयक ॲड.अरुण जाधव,एकलव्य संघटनेचे अध्यक्ष अनिल जाधव यांच्यासह अहमदनगर जिल्हा,तालुका,गाव शाखा विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
आदिवासी, भटके,अल्पसंख्यांक, ओबीसी,एसी,एसटी समाजातील जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे,जिल्हा महासचिव योगेश साठे,शहराध्यक्ष हनीफ शेख,भिंगार शहराध्यक्ष जे.डी. शिरसाठ,नगर तालुकाध्यक्ष मारुती पाटोळे यांनी केले.