
अहमदनगर (दि.४ मे):-अहमदनगर शहरातील कल्याण रोडवरील शिवाजीनगर येथे झालेल्या मारहाणी बाबत आता चांगलाच राजकीय गदारोळ उडाला असून ही मारहाण निलेश लंके यांच्या रॅलीतील माणसांनी केली असल्याचं आरोप जखमी झालेले मयूर कदम यांनी केला आहे.
मयूर कदम यांच्या आईस डोक्याला चांगलीच गंभीर इजा झाली असून त्यांना सध्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.मात्र या मारहाणीशी निलेश लंके यांच्या रॅलीतील माणसांचा आणि निलेश लंके यांच्या समर्थकांचा कोणताही संबंध नसून ते लोक रोडवरून जाणारे असल्याचं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी सांगितले आहे.
मयूर कदम यांची आई आमच्या आई प्रमाणेच असून निलेश लंके यांचा कोणताही समर्थक महिलेला मारहाण करणार नाही अशी आम्हाला खात्री आहे.त्यामुळे याप्रकरणी निलेश लंके आणि महाविकास आघाडीचा कोणताही संबंध नसल्याचं गिरीश जाधव यांनी सांगितले.