
मुंबई प्रतिनिधी:-इंडोटेक फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व महिलांसाठी सक्षमीकरण कार्यक्रमासाठी महिलांच्या प्रगतीसाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जात असतातकी यातून मुली व महिला या स्वतंत्र व्यवसाय करू शकतात.यातून महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध केली जाते.
त्याचाच एक भाग म्हणून इंडोटेक फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा रेशमा खरात यांनी इंडोटेक फाउंडेशन सुपर 999 धमाका ही ऑफर अल्प दरात महिलांसाठी मार्केटमध्ये आणली आहे.यात बेसिक ब्युटी पार्लर,केक मेकिंग, शिवण क्लास,ज्वेलरी मेकिंग,फॅन्सी बॅग,मेकिंग फास्टफूड,ब्रोच मेकिंग, बेसिक कम्प्युटर कोर्स, 40 ते 50 मुली व महिला संघ ज्या शहरात किंवा गावात असेल त्या ठिकाणी त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे व कोर्स पूर्ण झाल्यानंतर शासनमान्य प्रमाणपत्र देण्यात येईल असे फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले आहे.तरी सर्व मुली व महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन अधक्षा खरात यांनी केले आहे.
