मास्तरांच्या मुलाविरोधात नरेंद्र मोदी प्रचारासाठी येतात म्हणजे मी भाग्यवान निलेश लंके देशाचा शेतकरी,बहुजन समाज एकवटला की पाहा,परिणाम कसा होतोय लंके
अहमदनगर (दि.६ मे):-महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्र्यांच्या सभांचा धडाका लागणार आहे.ज्याचा शुभारंभ ७ मे ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भव्यसभेने होणार आहे.
तर दुसरीकडे निलेश लंके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होतेय म्हणजे ही माझ्या सारख्या गरिबाची ताकद असल्याचे म्हटले आहे.देशाचा शेतकरी, बहुजन समाज एकवटला की पाहा,परिणाम कसा होतोय.ही निवडणूक धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती अशी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी यांना आणून मोठ्या सभा करणं हा धनशक्तीचा देखावा आहे,असा निलेश लंके यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.