Maharashtra247

तरुणावर प्राणघातक हल्ला करणारे अखेर पकडले ६ आरोपी ताब्यात एलसीबीची कारवाई

अहमदनगर (दि.७ मे):-भिंगार जवळील नागरदेवळे येथील युवकावर प्राणघातक हल्ला करणारे ६ आरोपीना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.या बातमीची हकीगत अशी की,यातील तक्रादार पुष्कर संतोष शेलार (रा.नागरदेवळे ता.जि.अहमदनगर) हे नागरदेवळे गावातुन त्यांचे मित्रा सोबत किराणा माल घेवुन घरी जात असतांना सोहेल चाँद शेख रा.नागरदेवळे व त्याचे इतर ७ साथीदारांनी तक्रारदार यास तलवार,लाकडी दांडके,लोखंडी गजाने जिवे ठार मारण्याचे उद्देशाने मारहाण केली होती.

तसेच फिर्यादीचा मित्र यास सुध्दा शिवीगाळ दमदाटी करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती.या घटनेबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 472/2024 भादवि कलम 307,326, 324,323,504,506, 143,147,148,149, आर्म ऍ़क्ट कायदा कलम 4/25,महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1)(3)/135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्हा दाखल झाल्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.श्री.दिनेश आहेर यांना आरोपीचा शोध घेणेबाबत आदेश दिले होते.नमुद आदेशान्वये पोनि.श्री. आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील दोन पथके तयार करुन आरोपीची माहिती काढुन आरोपींना ताब्यात घेणेबाबत पथकास सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले होते.

पोलीस पथकाने गुन्हा झालेल्या ठिकाणी भेट देवुन गुन्ह्याचे पार्श्वभुमीची माहिती घेतली.सदर गुन्ह्यातील आरोपींनी गुन्हा घडल्यानंतर लगेच मोबाईल फोन बंद केलेले असल्याने आरोपी विषयी काहीएक माहिती मिळुन येत नव्हती.दोन्ही पोलीस पथके आरोपींचे मुकुंदनगर येथील नातेवाईकांकडे माहिती काढत असतांना पोनि. श्री.दिनेश आहेर यांना सदरचे आरोपी हे मुकुंदनगर या ठिकाणी एका शेडमध्ये लपुन बसलेले असल्याची माहिती प्राप्त झाली.पोनि.श्री.आहेर यांनी प्राप्त माहिती तात्काळ पथकास कळवुन आरोपींना ताब्यात घेणेबाबत सुचना दिल्या. त्यानुसार पोलीस पथकाने बातमीतील ठिकाणी जावुन खात्री करता एका पत्र्याचे शेडमध्ये 06 इसम बसलेले दिसले.सदर इसमांना ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे सोहेल चाँद शेख रा. बुऱ्हानगर रोड, नागरदेवळे,ता.जि.अहमदनगर,शोएब चाँद शेख,शोएब हमीद सय्यद,अमीन हुसेन पठाण,साहील अकबर पठाण,रियाज उर्फ बाबा मुनीर पठाण असे असल्याचे सांगितले.

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपासकामी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हे करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी,नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/तुषार धाकराव, पोलीस अंमलदार भाऊसाहेब काळे, मनोहर गोसावी,दत्तात्रय गव्हाणे,रविंद्र कर्डीले, संतोष खैरे,रोहित मिसाळ,फुरकान शेख, शिवाजी ढाकणे,रणजित जाधव,संतोष लोढे, प्रशांत राठोड,मेघराज कोल्हे,सचिन अडबल अरुण मोरे यांनी केलेली आहे.

You cannot copy content of this page