शिर्डी लोकसभेच्या वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्यावर जीवघेणा हल्ला गाडीच्या काचा फोडल्या
संगमनेर (राजेंद्र मेढे):-अहमदनगर जिल्ह्यात लोकसभेचे वातावरण चांगले तापलेले आहे.
आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहे.त्यातच अकोले तालुक्यातील राजूर येथे शिर्डी लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या गाडीवर भ्याड जीवघेणा हल्ला झाला आहे.
त्या आज अकोले तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या अकोले तालुक्यातील प्रचाराचा दौरा आटपून उत्कर्षा रूपवते संगमनेर कडे येत असताना त्यांच्या गाडीवर भ्याड हल्ला करण्यात आला आहे या हल्ल्यात उत्कर्ष रूपवते यांना कुठलीही इजा झाली नाही पण गाडीचे मोठ्या प्रमाण नुकसान झाले आहे.या बाबत राजुर पोलीस ठाण्यात अज्ञात आणि विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची माहिती समजताच वंचित बहुजन आघाडीचे व उत्कर्षाताई समर्थक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल होत घटनेचा निषेध नोंदवला घटनेची माहिती समजताच राजुर पोलीस दाखल होत घटनेचा पंचनामा केला आहे.या भ्याड हल्ल्याचा समाज माध्यमातून घटनेचा जाहिर निषेध व्यक्त करत आहेत.तरीही माझा प्रचार दौरा अजून ताकतीने चालू ठेवणार असल्याचे यावेळी उत्कर्ष रूपवते यांनी सांगितले.