Maharashtra247

जखमी ॲड.अशोक कोल्हे यांची निलेश लंके यांनी रुग्णालयात जाऊन तब्येतीची केली विचारपूस

नगर (प्रतिनिधी):-अहमदनगर शहरातील कौटुंबिक न्यायालयाच्या आवारातच ॲड.अशोक कोल्हे यांच्यावर आज्ञातांकडून भ्याड हल्ला करण्यात आला होता.यात ते गंभीर रित्या जखमी झाले होते.

त्यांच्यावर नगर येथे रुग्णालयात उपचार सुरु असून नगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार निलेश लंके यांनी त्यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली.व काही दिवसांपूर्वी देखील अशाच प्रकारे राहुरी येथील ॲड.राजाराम आढाव व त्यांच्या वकील पत्नी यांची हत्या करण्यात आल्याचे प्रकरण घडले होते.कायद्याची सेवा आणि रक्षण करणाऱ्यांवर अशा पद्धतीने होणारे हल्ले अतिशय चिंताजनक असून मी या सर्व प्रकाराचा जाहिरपणे निषेध करतो.असे निलेश लंके यावेळी म्हणाले. यावेळी शिवसेना शहर प्रमुख संभाजीराजे कदम, राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर,ॲड.सुरेश लगड इ.उपस्थित होते.

You cannot copy content of this page