देशाला नीलेश लंकेंची गरज त्यांना दिल्लीला पाठवाच..! खा.सुप्रिया सुळे यांचे आवाहन…
प्रतिनिधी:-एक सुसंस्कृत,कष्ट करणारा, तुमच्या आमच्या बरोबर असणारा अतिशय प्रेमळ लोकप्रतिनिधी म्हणून आपण निलेश लंके यांना विधीमंडळात पाठविले.आता त्यांना दिल्लीला पाठवायचे असून देशाला नीलेश लंके यांची गरज असल्याचे खा.सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ शेवगांव तालुक्यातील भातकुडगांव येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये सुप्रिया सुळे बोलत होत्या.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सभेच्या अध्यक्षस्थानी होते.यावेळी राजेंद्र वळवी,वसंतराव चव्हाण, राजेंद्र आघाव,प्रताप ढाकणे,सुभाष लांडे, योगिता राजळे, ॠषीकेश ढाकणे, दत्तात्रेय फुंदे,शिवशंकर राजळे,समिर काझी,अशोक रोडे,वजीर पठाण,बाळासाहेब धोंडे, रामभाऊ साळवे, रामदास गोल्हार,राजेंद्र दौंड,बंडू रासने,सुभाष केकाण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना सप्रिया सुळे म्हणाल्या, मत मागताना आपण कुणासाठी मते मागतोय हा देखील प्रश्न असतो. मला अभिमान वाटतोय की नीलेश लंके यांच्यासाठी मते मागण्याची संधी मला मिळाली.ही संधी दिल्याबद्दल मी इंडिया आघाडीला धन्यवाद देते. या सगळया निवडणुकीत आम्ही जी मेहनत घेतोय, कदाचित त्यापेक्षा जास्त मेहनत काँग्रेस आणि शिवसेना घेतेय हे मी गेल्या महिनाभरापासून अनुभवते असे सुळे म्हणाल्या.