Maharashtra247

मी ज्या मंदिराचे भूमपूजन करतो त्याचे कलशारोहण होते ह.भ.प.जंगले महाराज शास्त्री;श्री.मार्कंडेय मंदिर सभामंडप भूमिपूजन संपन्न

नगर (दि.११ मे):-अक्षय तृतीया दिवस हा हिंदू धर्मातील पवित्र दिवस असुन आजच्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मंदिराचे जीर्णद्धाराचे नियोजन केले हे अध्यात्मिक दृष्टीने फार महत्वाचे आहे. मंदीर जीर्णोद्धार करणाऱ्या लोकांचे मी कौतुक करतो यांना सर्व देवीदेवतांचे आशीर्वाद प्राप्त होतील.

आज पर्यंत मी ज्या ज्या मंदिराचे भूमिपूजन केले आहे त्या त्या मंदिराचे काम पूर्ण झालेले असुन मार्कंडेय मंदिराचेही काम येणाऱ्या दोन वर्षात पूर्ण होईल अशी मला आशा आहे,असे प्रतिपादन ह. भ. प. जंगले महाराज शास्त्री यांनी केले.

पद्मशाली पंच कमिटी ज्ञाती समाज,श्री मार्कंडेय मंदिर देवस्थान व समस्त पद्मशाली समजाच्या वतीने गांधी मैदान महामुनी चौक येथे दिनांक ८,९ व १० मे रोजी मार्कंडेय मंदिर सभामंडप भूमिपूजन समारंभ संपन्न झाले यावेळी अध्यक्ष स्थानी ह. भ. प. जंगले महाराज शास्त्री होते. याप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख उपस्थिती म्हणून श्री विशाल गणेश मंदिराचे पुजारी प. पू. संगमनाथ महाराज, आ. संग्राम जगताप, नगरसेवक मनोज दुलम, भाजपा नेते वसंत लोढा, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, बजरंग दलाचे कुणाल भंडारी, राष्ट्रीय सेवक संघाचे अनिल जोशी, विश्व हिंदू परिषदेचे अनील रासने उपस्थीत होते.

यावेळी आ. संग्राम जगताप यांनीही आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले श्री मार्कंडेय मंदीर हे ऐतिहासिक मंदीर असुन या मंदिराचे काम पूर्ण झाले तर अहमदनगर शहराच्या वैभवात नक्कीच भर पडेल. या मंदिरा साठी व याच्या विकासासाठी आपण सर्व ते सहकार्य करेल असे आश्वासन दिले.या वेळी वसंत लोढा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. गेल्या तीन दिवसाच्या भरगच्च कार्यक्रमास मा. खा. सुजय दादा विखे, मा आ. निलेश लंके, मा. खा. पका पाटील, अभय आगरकर मा महापौर अभिषेक कळमकर, काँग्रेस चे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे शिवसेना चे शहर प्रमुख संभाजी कदम,नगरसेवक अप्पा नळकांडे, संदीप दातरंगे आदीनी मंदिरात येवून मार्कंडेय मूर्तीचे दर्शन घेतले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पद्मशाली समाजाचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी केले तर आभार सचिव अमित बूरा यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश बुरा यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री मार्कंडेय मंदिराचे अध्यक्ष गणेश विद्ये, शहर बँक संचालक दत्तात्रय रासकोंडा, शरद मडुर, लक्ष्मण बुरा, त्रीलेश येंनगंदूल, रवी दंडी,विनायक बोगा, पुरोहित ज्ञानेश्वर मंगलाराप, नल्ला महाराज, शुभम सुंकी, श्रीनिवास बुरगुल, अमित बुरा, पुरशोत्तम बुरा, ऍड राजू गाली, संजय बाले , अभिजित चिप्पा, रितेश अनमल, इगे राजेंद्र, गिरीश चिट्टा, अमीत बिल्ला, जोग दत्तात्रय कुमार आडेप, संजय वल्लाकट्टी, सागर सब्बन , ऋषिकेश गुंडला , विलास दिकोंडा व राजेंद्र बोगा आदींनी सहकार्य केले.

 

You cannot copy content of this page