प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीच्या उमेदवार आरती हालदार यांची प्रचारात आघाडी;यावेळी पत्रकारांशी बोलताना आरती हालदार काय म्हणाल्या पहा सविस्तर व्हिडिओ मध्ये
अहमदनगर (प्रतिनिधी):-अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापलेले दिसत आहे.
त्यातच प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीच्या अधिकृत उमेदवार आरती किशोर कुमार हालदार याही आपल्या नशीब आजमवत आहे.त्यांनी प्रचारात चांगली आघाडी घेतली आहे.विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवणार आहे असे त्या म्हणाल्या. यावेळी उमेदवार आरती हलदार यांनी पत्रकार परिषदेत घेत विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला.यावेळी त्या म्हणाल्या की शिक्षणाचे व्यापारीकरण थांबवणार तसेच सध्याचे जे सरकार आहे त्यांनी ६२ हजार सरकारी शाळा विकायला काढल्या आहे त्याला विरोध करून थांबवून गोरगरीब मुले शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी प्रयत्न करणार आहे.
तसेच राज्यातील सर्व मुलांना मोफत शिक्षण करण्यासाठी ही प्रयत्न करणार असल्याचे म्हणाल्या.अहमदनगरच्या विकासासाठी अतिशय आवश्यक असलेल्या एमआयडीसीला ड्राय झोन करणे,हप्ते वसुली बंद करणे जेणेकरून एमआयडीसीत चांगल्या कंपन्या येतील व येथील सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींना रोजगार मिळेल व येथील स्थानिक नागरिकांना परगावी नोकरीसाठी जावे लागणार नाही.यावेळी सौ.हालदार म्हणाल्या की आज ७६ वर्षानंतर पण अहमदनगरच्या भरपूर गावांमध्ये महिलांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी तारेवरची कसरत घ्यावा लागते त्या महिलांच्या काय हाल अपेष्टा होतात हे एक महिला म्हणून मी जाणू शकते म्हणून नागरिकांनी विचार न करता येत्या १३ मे रोजी रिक्षा या चिन्हावर बटन दाबून मला जास्तीत जास्त लिड देऊन विजयी करा असे आवाहन सौ.आरती हालदार यांनी केले आहे.