शहरातील अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी कापड बाजारात तरुणावर प्राणघातक हल्ला
अहमदनगर (दि.१६ मे):-अहमदनगर शहरातील अत्यंत गजबजलेल्या कापड बाजारातील लोकसेवा हॉटेल जवळ प्रशांत काळे नामक तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.
चारच दिवसापूर्वी एका माजी नगरसेवकावर मंगलगेट येथे हल्ला झाला होता यात स्कॉर्पिओ गाडीची मोठया प्रमाणात तोडफोड झाली होती त्याचा राग धरत तू आमची गाडी फोडली म्हणत प्रशांत काळे यास लाथा बुक्यांनी बेदम मारहाण करण्यात आली आहे.
यात नेमकी मारहाण कोणी केली व कोणाचा सांगण्यावरून केली हे आद्यपही समजले नाही. जखमी तरूणास जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.यावेळी कोतवाली पोलीस ठाण्याच्या व तोफखाना पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला.पुढील तपास कोतवाली पोलीस हे करत आहे.