Maharashtra247

राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई;गावठी हातभट्टी दारू निर्मिती केंद्र केले उध्वस्त 

अहमदनगर (दि.१६ मे):-अहमदनगर लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिताच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.२ श्रीरामपर यांनी देवळाली प्रवरा ता. राहरी,या ठिकाणी हातभट्टी गावठी दारू निर्मिती करणाऱ्या केंद्रांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.हि कारवाई दि.१६ मे रोजी मोहीम राबवून करण्यात आली.अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.२ श्रीरामपूरचे निरीक्षक श्री.अनुपकुमार देशमाने यांनी दिली.

या कारवाईत एकुण ०४ गुन्हे नोंद करण्यात आले असून २०४ ली.हातभट्टी गावठी दारू व ९१२० ली. रसायन नष्ट करण्यात आले.या मुद्देमालाची एकूण किमत रु.४ लाख ०८५५०/-रु.इतकी आहे.०८ आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदरील कारवाई श्री.डॉ.विजय सूर्यवंशी, आयुक्त,राज्य उत्पादन शुल्क,म.रा.मुंबई,श्री. सागर धोमकर विभागीय उपआयुक्त राज्य उत्पादन शुल्क पुणे विभाग पुणे,श्री.प्रमोद सोनोने अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क, अहमदनगर,श्री.प्रवीण कुमार तेली, उपअधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क,अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली श्री.अनुपकुमार देशमाने, निरीक्षक,भरारी पथक क्र.२ श्रीरामपूर,श्री. एस.के.सहस्रबुद्धे निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क संगमनेर विभाग, श्री.जी.एन.नायकोडी, दुय्यम निरीक्षक,श्री. निलेश बी.पालवे दुय्यम निरीक्षक भरारी पथक क्र.२ श्रीरामपूर,दुय्यम निरीक्षक श्री.सी. एस.रासकर,श्री.के.टी. ढावरे,श्री.आर.बी. गायकवाड,श्री.वाय, बी.पाटील,श्री.पी.एस. पार्टील,श्री.एस.एस.पवार,कु.पी.एस.देखणे सहाय्यक दुय्यम निरीक्षक,श्री.एस.आर. वाघ,श्री.एस,डी. साठे,ए.के.शेख,जवान सर्वश्री टी.आर.शेख, एस.जी.गुंजाळ,ए.एल. मेंगाळ,एस.एस.लवांडे. ए.के.सय्यद,सी.बी. पाटोळे व महिला जवान श्रीमती एस. आर.फटांगरे,श्रीमती वर्षा जाधव,श्रीमती एस.आर. वराट तसेच जवान नि वाहन चालक श्री एस.व्ही.बिटके,एस. एम.कासुळे,यांनी केली आहे.

अवैध हातभट्टी गावठी दारू निर्मिती,वाहतूक व विक्री ठिकाणी व अवैध ढाबे यावर सातत्याने कारवाई केली जाणार असल्याची माहिती श्री. अनुपकुमार देशमाने निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.२ श्रीरामपूर यांनी दिली.

You cannot copy content of this page