
अहमदनगर (दि.१७ मे):-घरफोडीच्या गुन्ह्यातील सराईत आरोपीस कोतवाली पोलीसांनी ताब्यात घेऊन त्याचेकडे ५ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहे.यातील फिर्यादी श्री.मधुकर तबाजी भावले (रा.आशिर्वाद निवास,बालाजी कॉलनी, शाहुनगर,केडगाव, अहमदनगर) हे सेवानिवृत्त पेन्शनर आहे.
ते त्यांचे मुलाकडे पुणे येथे गेलेले असताना त्यांचे बंद घराचे दरवाजाचा कडी कोंडा तोडून घरात प्रवेश करुन कपाटाचे लॉक तोडुन 15,000/-रुपये चोरून नेले आहे.त्याबाबत तक्रारदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गु.र.नं. 581/2024 भादंवि क. 454,457,380 प्रमाणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर कोतवली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी गुन्ह्याचा तपास करणे कामी गुन्हे शोध पथकास आदेश दिले.
गुन्हे शोध पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, सदरचा गुन्हा हा वडारवाडी,केडगाव, अहमदनगर येथे रहाणारा विष्णु धोत्रे याने केलेला असुन त्याचेवर घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहे. त्यावरुन गुन्हे शोध पथकाच्या सपोनि/ योगिता कोकाटे व पोलीस स्टाफ यांनी केडगाव परिसरात शोध घेतला असता तो मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपीची चोरीच्या गुन्ह्याचे अनुशंगाने विश्वासात घेवुन चौकशी केली.आरोपीने गुन्ह्याची कबुली देवुन पंचासमक्ष त्याचे रहाते घरात लपवुन ठेवलेला एकुन 50,000/- रु.कि.चा मुद्देमाल त्यात 28,000/- रु.रोख, 22,000/- रु.किं.चे सोन्याचे दागिणे व चांदीच्या वस्तु असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन आरोपीने कोतवाली पोलीस स्टेशन,अहमदनगर हद्दीत केलेले खालील नमुद गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग श्री.अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या सूचनेनुसार सपोनि/योगिता कोकाटे, पोउपनिरी प्रविण पाटील,पोहेकॉ/राहुल शिंदे,पोहेकॉ/शाहीद शेख,पोहेकॉ/योगेश भिंगारदिवे,पोहेकॉ/ ए.पी.इनामदार,संदिप पितळे,पोना/अविनाश वाकचौरे,मपोना/संगिता बडे,पोकॉ/अभय कदम, पोकॉ/दिपक रोहोकले, पोकॉ/सत्यजित शिंदे, पोकॉ/तानाजी पवार, पोकॉ/सुरज कदम, पोकॉ/प्रमोद लहारे, पोकॉ/अमोल गाडे, पोकॉ/सुजय हिवाळे, पोकॉ/सचिन लोळगे यांनी केली आहे