
अहमदनगर (दि.१७ मे):-खूप मोठ्या प्रमाणावर परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्या प्रकरणी ध्येय मल्टिस्टेट निधी लिमिटेडच्या चेअरमनसह ७ संचालकांवर सौ.सुजाता संदिप नेवसे (रा.शोभा कॉलनी,शिंदे मळा,सावेडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरनं. ६१३/२०२४ भादवि. क,४२०,४०६,महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधि.१९९९ कलम ३ व ५ प्रमाणे तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी चेअरमन विशाल लक्ष्मण भागानगरे (रा.पंचपीर चावडी, माळीवाडा,अहमदनगर), व्हा.चेअरमन रोहिदास सत्यदेव कवडे (रा. गुलमोहर रोड, सावेडी,अहमदनगर), संचालक व सीईओ राहुल बबन कराळे,टोकेवाडी,ता.नगर, जि.अहमदनगर),संचालक निलेश शिवाजी फुंदे (रा.राजलक्ष्मी सेंटर, सावेडी,अहमदनगर),गणेश कारभारी कराळे (रा.आगडगाव,ता.नगर, जि.अहमदनगर),पूजा विलास रावते,विलास नामदेव रावते (दोघे,रा.बोरुडे मळा,सावेडी,अहमदनगर आदीवर गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्याचे पोनि.आनंद कोकरे यांच्या सूचनेनुसार पोसई/सचिन रणशेवरे हे तपास करीत आहेत.