Maharashtra247

मित्रानेच केला मित्राचा खून स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपी जेरबंद

अहमदनगर (दि.२७ मे):-पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथे झालेल्या खुन प्रकरणात मित्रानेच केला मित्राचा खून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करत आरोपीस जेरबंद केले आहे.बातमीची हकिगत अशी की,यातील फिर्यादी महेश बाळु जाधव (रा. मांडवे,ता.पाथर्डी,जि. अहमदनगर हल्ली रा. मोगरे वस्ती,साने कॉलनी,झेंडा चौक, पिंपरी चिंचवड पुणे) यांनी दि.४ मे रोजी फिर्याद दिली की,त्यांचा भाऊ अविनाश बाळु जाधव रा.मांडवे ता. पाथर्डी हा त्याचे घरासमोर पढवीमध्ये झोपलेला असतांना त्यास कोणीतरी अज्ञात आरोपींनी अज्ञात कारणासाठी त्याचे डोक्यामध्ये कोणत्यातरी धारदार हत्याराने मारहाण करुन खुन केला आहे.

या घटनेबाबत पाथर्डी पोलीस ठाणे गु.र.नं. 486/2024 भादवि कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या होत्या.नमुद आदेशान्वये पोनि/श्री. आहेर यांनी यांनी गुन्हा घडले ठिकाणी मांडवे, ता.पाथर्डी या ठिकाणी भेट देवुन घटना ठिकाणची पाहणी केली होती.तसेच गुन्हा उघडकीस आणणे स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांचे पथक तयार करुन पथकास गुन्हा उघडकीस आणणेकामी सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केले होते.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथकाने गुन्हा ठिकाणी जावुन पाहणी केली असता गुन्हा घडले ठिकाणी कोठेही सी.सी.टी.व्ही.कॅमेरे नसल्याने आरोपीची काहीएक माहिती मिळुन येत नव्हती.पथकाने मयत नामे अविनाश बाळु जाधव याचे कोणासोबत यापुर्वी वाद होते काय याबाबत माहिती काढली असता मयताचे व मयताचा मित्र अमोल नवनाथ आठरे रा.कौडगांव आठरे (ता. पाथर्डी) याचे सोबत वाद झाल्याबाबत माहिती प्राप्त झाली.

पथकाने गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे अमोल नवनाथ आठरे यास ताब्यात घेवुन त्याचे कडे गुन्ह्याबाबत सखोल विचारपुस केली असता त्याने कळविले की,मी व अविनाश जाधव असे दोघे मित्र होतो.अविनाश जाधव याने मला गांजा पिण्याचे व्यसन लावले होते तसेच अविनाश जाधव हा मला नेहमी गांजा ओढण्यासाठी व दारु पिण्यासाठी नेहमी पैशाची मागणी करत असे.मी व अविनाश जाधव मित्र असल्याने आमचे एकमेकांचे घरी नेहमी येणे जाणे होते. अविनाश जाधव यास दारु व गांजा ओढण्याचे व्यसन असल्या कारणाने माझे आई वडिल मला व अविनाश जाधव यास रागावुन बोलत असे.अविनाश जाधव याने माझे वडिल दुध विकत असलेल्या ठिकाणी तिसगांव येथे जावुन त्यांना त्या ठिकाणी शिवीगाळ करुन,हात पाय तोडुन टाकण्याची धमकी दिली व दुध सांडुन दिले होते. त्यामुळे सदर दिवशी मी अविनाश यास तु माझे वडिलांना शिवीगाळ का केली व धमकी का दिली याबाबत जाब विचारले असता त्याने मला सुध्दा शिवीगाळ दमदाटी केली.मी आमचे घरुन ऊस तोडण्याचा कोयता घेवुन गाडीचा आवाज येवु नये म्हणुन माझेकडील इलेक्ट्रीक गाडीवरुन अविनाश जाधव याचे घरी जाते वेळी माझे कडील कोयत्याने रस्त्याचे कडेला असलेल्या बाभळीचे झाडाची फांदी तोडुन अविनाश जाधव याचे घरी गेलो. माझे कडील मोटारसायकल त्याचे घरासमोर लावुन त्याच्या घराकडे जावुन पाहिले असता अविनाश जाधव हा त्याचे पढवीमध्ये झोपलेला होता.मी माझे कडील बाभळीचे काठीने त्याचे डोक्यामध्ये मारले असता तो ऊठुन बसला परंतु तो नशेमध्ये असल्याने त्यास काहीएक समजत नव्हते.

त्यास मी पुन्हा माझे हातातील काठीने मारले असता आमचे दोघामध्ये झटापट झाली व अविनाश जाधव हा मला मारण्यासाठी काहीतरी हत्यार शोधत असतांना मी माझे गाडीवर ठेवलेला कोयता घेवुन कोयत्याने त्याचे डोक्यावर,पाठीवर वार केले असता तो मोठ्याने आरडा ओरडा करु लागल्याने मी तेथुन पळुन आलो असल्याची कबुली दिली आहे.ताब्यात घेण्यात आलेला आरोपी यास पाथर्डी पोलीस ठाणे गु.र.नं.486/2024 भादवि कलम 302 प्रमाणे गुन्ह्याचे तपासकामी पाथर्डी पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास पाथर्डी पोलीस ठाणे हे करीत आहेत.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक, श्री.सुनिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/सोपान गोरे, पोलीस अंमलदार मनोहर गोसावी,रविंद्र कर्डीले, सुरेश माळी,संतोष लोढे, संदीप चव्हाण,देवेंद्र शेलार,संतोष खैरे, फुरकान शेख,मेघराज कोल्हे,चंद्रकांत कुसळकर यांनी केलेली आहे.

You cannot copy content of this page