स्नेहालय संचलित बालभवन प्रकल्पातील १० वी व १२ वीच्या परीक्षेत सेवावस्तीतील विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी
अहमदनगर (दि.२८ मे):-अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करून आज अखेर सेवावस्तीतील सेवेकरी पालकांच्या मुलांना आपल्या कष्टाचे चीज झाल्या सारखे वाटले.
स्नेहालय संचलित बालभवनमधील १० वी व १२ वी चा निकाल अतिशय उत्कृष्ठ लागला.कोणतीही शैक्षणिक परिस्थिती व वातावरण नसताना एकूण ६२ विद्यार्थ्यांनी १० वीची तर ४१ विद्यार्थ्यांनी १२ वीची परीक्षा दिली होती. यापैकी विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत.
चालू शैक्षणिक वर्ष २०२३ -२४ वर्षातील इयत्ता दहावीचा व बारावीचा निकाल ऑनलाइन वेबसाईटवर प्रसिद्ध झाला.यामध्ये बारावी मध्ये ३४ विद्यार्थी व १० वी मध्ये ४९ विद्यार्थी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले.विशेषतःइयत्ता दहावी मध्ये अर्चना राजू दिनकर (परीस बालभवन) या विद्यार्थिनीने ८०.८० % मिळवून प्रथम क्रमांक पटकावला व अमृता कुणाल जगताप (उत्कर्ष बालभवन) या विद्यार्थिनीने ७६.२० % मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला.
व शेख कशफ युनूस (मलाला बालभवन) या विद्यार्थिनीने ७२.४०% व नायडू भाग्यश्री आंनद (हळबे बालभवन)या विद्यार्थिनीने ७२.४०% मिळवून तृतीय क्रमांक पटकवला आहे. का ही इंत्रे झाखेवर राखी विनोद ( हळबे बालभवन) या विद्यार्थिनिने ७२.२०% मिळवून चौथा क्रमांक मिळवला आहे.त्या बरोबर इयता बारावी मध्ये नमिला सईद बेग (हळबे बालभवन) या विद्यार्थिनीने 74.33% मिळवून आर्ट्स शाखेत प्रथम क्रमांक पटकावला, तर सानिया सईद बेग ( हळबे बालभवन)या विद्यार्थिनीने 70.67% मिळवून आर्ट्स शाखेत द्वितीय क्रमांक मिळविला व तस्किन अन्सार सय्यद (उर्जा बालभवन) या विद्यार्थिनीने 70% मिळवून विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक पटकावला, व सिद्धार्थ विलास पगारे (उत्कर्ष बालभवन) या विद्यार्थ्याने 53.33 % मिळवून वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक मिळवला आहे.
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भावी आयुष्य व पुढील वाटचालीसाठी बालभवन प्रकल्पाचे मानद संचालक वैशाली चोपडा,स्नेहालायाचे संचालक हनीफ शेख, स्नेहालयाचे अध्यक्ष जयाताई जोगदंड,सचिव डॉ.प्रीती भोंबे,संजय बांदिष्ठ,राजीव गुजर, प्रकल्प व्यवस्थापक सौ. उषा खोल्लम,संतोष बेदरकर,निलोफर शेख, शिक्षक समन्वयक प्रतीक्षा साळवे व सर्व बालभवन केंद्र समन्वयक व सर्व शिक्षकवृंद आदींनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे स्नेहालय बालभवन परिवाराने अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सौ.उषा खोल्लम,प्रकल्प व्यवस्थापक
बालभवन प्रकल्प,अहमदनगर
मो.9011026498