Maharashtra247

स्नेहालय संचलित बालभवनातील १० वी व १२ वी परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव उत्साहात साजरा

अहमदनगर (प्रतिनिधी):-१० वी व १२ वी बोर्ड परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम उत्कर्ष बालभवन,लालटाकी या ठिकाणी स्नेहालय संचलित बालभवन प्रकल्पाने ४ जुन रोजी आयोजित केला होता.

घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असताना प्रबळ इच्छाशक्ती असतानाही ज्यांना शिकण्यासाठी कसरत अन धडपड करावी लागत आहे.अशा मुलांनी कठोर परिश्रम करून इ.१० वी व १२ वी चा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे.

व या वर्षीही मुलींनी घरची जबाबदारी सांभाळून सर्वाधिक प्रमाणात उत्कृष्ट गुणांनी यशस्वी होण्याची परंपरा कायम ठेवली आहे.या विद्यार्थ्यांना पाठबळ मिळण्यासाठी,पालक या नात्याने पाठराखण करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.अहमदनगर शहरातील आठ झोपडपट्टी परिसरात हा बालभवन उपक्रम राबविला जातो. बालमजूर,बालभिक्षुक, वंचित,दुर्लक्षित व विविध समस्यानी ग्रस्त बालकांच्या शैक्षणिक विकासाला प्रोत्साहन दिले जाते.चालू शैक्षणिक वर्षामध्ये इ.१०वी व १२वी मध्ये यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी गौरव प्रमाणपत्र,वही देऊन तसेच पेढे भरवून सत्कार व गुणगौरव केला.डॉ. प्रिती भोंबे व इतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते इ.१० वी मध्ये घवघवीत यश मिळविलेल्या अर्चना राजू दिनकर (८०.८० % )मिळवून प्रथम क्रमांक मिळविला तर अमृता कुणाल जगताप (७६.२० % ) मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला व शेख कशफ युनूस याने ( ७२.४०%) तृतीय क्रमांक मिळविला व झाखेवर राखी विनोद हिने (७२.२०%) चौथा क्रमांक मिळवला आहे.

त्याच बरोबर इयता १२ वी मध्ये नमिला सईद बेग आर्ट्स शाखेत प्रथम क्रमांक,सानिया सईद ( 70.67% ) आर्ट्स शाखेत द्वितीय क्रमांक,तस्किन अन्सार सय्यद (70%) मिळवून विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक,सिद्धार्थ विलास पगारे( 53.33 % )मिळवून वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक मिळवला आहे.यावर्षी विशेष बाब म्हणजे घरची जबाबदारी सांभाळून महिलांनी सुद्धा परीक्षा देऊन घवघवीत यश संपादन केले या मध्ये इयत्ता १० वी मध्ये भाग्यश्री आनंद नायडू (७२.४०%) व रेश्मा अल्ताफ पठाण (६७.६०%) व इ.१२ वी मध्ये फिरोज खान (६०%) मिळवून या गुणवंत विद्यार्थ्यांना गौरव प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सदरील कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत वैशाली चोपडा यांनी विद्यार्थ्यांच्या प्रामाणिकपणा,चिकाटी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश संपादन केले याचे कौतुक केले.आपल्या जीवनात नेमके काय करायचे या बाबत मार्गदर्शन करून पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित करून शुभेच्छा दिल्या.

गणेश फुलारी सरांनी विद्यार्थ्यांनी पुढील आयुष्याचा विचार करून,पुढे वाटचाल करा व कायम आनंदी व सकारात्मक राहा,स्नेहालय बालभवन नेहमी तुमच्या पाठीशी आहे असा संदेश दिला.तसेच हनिफ शेख सरांनी मुलांना पुढील उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.विद्यार्थ्यांनी आयुष्याची स्वप्ने कशी रेखाटावी,नेमके यशाची झेप कशी घ्यावी या बाबत प्रेरणा दिली.तुम्ही तुमचे लहान भाऊ व बहिण तसेच बालभवनच्या विद्यार्थ्यांचे आदर्श आहात.तुमच्या पंखाना बळ देण्यासाठी आम्ही कायम तत्पर आहोत.असे वक्तव्य करून पुढील उच्च शिक्षणासाठी प्रेरणा दिली.या कार्यक्रमातील अध्यक्षीय भाषणात डॉ. प्रिती भोंबे यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी विद्यासंयोग व भाटेवरा स्कॉलरशिप संदर्भात सविस्तर माहिती दिली आयुष्यात काहीतरी करायचे आहे.त्यासाठी शिक्षणच घेतले पाहिजे. त्याशिवाय पर्याय नाही.यश हे आपल्या बुध्दी व चातुर्यावर अवलंबून असते.उज्वल भविष्यासाठी कठोर परिश्रम करूनच यश संपादन करता येते.या कार्यक्रमात एकूण ७८ विद्यार्थ्यांनी या सहभाग नोंदविला होता.या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून वैशाली चोपडा,डॉ.प्रिती भोंबे,गणेश फुलारी,सौ.वंदना फुलारी,हनीफ शेख,सौ.शबाना शेख आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना बालभवनचे मानद संचालक वैशाली चोपडा यांनी केले.प्रमुख पाहुण्यांचा सत्कार सौ. सुनिता सोळस्कर यांनी केला तर सुत्र संचालन कु.अर्चना दिनकर यांनी केले तर आभार रूबिना शेख यांनी मानले.या कार्यक्रमास उषा खोल्लम,संतोष बेदरकर, प्रतीक्षा साळवे , निलोफर शेख व बालभवन टीम आदीनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

You cannot copy content of this page