घरफोडी करणारी आंतरजिल्हा आरोपींच्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले ५ लाख सोन्या चांदीच्या दागिन्यासह जेरबंद;तब्बल ५० गुन्हे दाखल असलेला सराईत आरोपीचा घरफोडीत समावेश
अहमदनगर (दि.५ जुन):-घरफोडी करणारी आंतरजिल्हा सराईत आरोपींच्या टोळीस जेरबंद करून तब्बल ७४ मि.ग्रॅम सोने व ३०० ग्रॅम चांदी असे एकूण ५ लाख ३८ हजार १०० रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश प्राप्त झाले आहे.बातमीची हकिगत अशी की,श्री.रखमा बालाजी सुंबे (रा.अमृत कलश रेसिडेंसी,बी.बिल्डींग फ्लॅट नंबर ०५ बोरुडे मळा,बालीकाश्रम रोड, अहमदनगर) हे दि.२५ मे रोजी त्यांचे घरास कुलुप लावुन कामानिमीत्त बाहेर गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांचे घराचा कडी कोयंडा तोडुन कपाटातील ६६०००/- रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने घरफोडी करुन चोरुन नेले होते.
सदर घटनेबाबत तोफखाना पोलीस ठाणे येथे गु.र.नं.६४७/२०२४ भादवि कलम ४५४,३८०प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.अहमदनगर जिल्ह्यामध्ये घरफोडीच्या वारंवार घटना घडत असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री. दिनेश आहेर यांना घरफोडी चोरी करणारे आरोपींची माहिती काढुन गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेशित केले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पथक नेमुन गुन्हे उघडकिस आणणे बाबत सुचना दिल्या होत्या.सदर सुचना प्रमाणे पथकाने जिल्ह्यातील घरफोडी झालेल्या ठिकाणी भेटी देवुन घटना ठिकाणचे आजुबाजुस असलेले फुटेज संकलित करुन सदरचे फुटेज हे महाराष्ट्र राज्यामध्ये आरोपींची ओळख पटविणेकामी प्रसारित केले होते.
त्यानुसार सदर फुटेजमधील एक आरोपी हा किशोर तेजराव वायाळ रा.बुलढाणा हा असल्याची माहिती प्राप्त झाली होती.पोलीस पथक सदर आरोपीचा शोध घेत असतांना दि.३ जूनेह रोजी सदर आरोपी हा त्याचे साथीदारासह अहमदनगर जिल्ह्यामध्ये पुन्हा चोरी करण्यासाठी आलेला असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने पाईपलाईन रोड ते वडगांव गुप्ता गावाकडे जाणारे रोडवरील नातु बागेजवळ सापळा लावुन आरोपी नामे किशोर तेजराव वायाळ रा.मेरा बु ाा, ता.चिखली,जि. बुलढाणा,गोरख रघुनाथ खळेकर रा.शिरसवाडी, ता.जि.जालना,विष्णु हरिश्चंद्र हिंगे रा. चंदनझिरा कॉलनी, जालना,ता.जि.जालना यांना ताब्यात घेण्यात आले.ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडे गुन्ह्यांचे अनुषंगाने विचारपुस करता त्यांनी त्यांचा साथीदार रुद्राक्ष पवार पुर्ण नांव माहिती नाही.रा.लाखनवाडा, ता. खामगांव,जि.बुलढाणा (फरार) याचे सोबत अहमदनगर,नेवासा, चाळीसगांव,जि. जळगांव,पैठण,जि.छ. संभाजीनगर या ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली आहे.ताब्यात घेण्यात आरोपींकडुन ७४ मिली ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने,३०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने,गुन्हा करतेवेळी वापरलेली कटावणी असा एकुण ५ लाख ३८ हजार १००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.यातील किशोर तेजराव वायाळ हा आरोपी अत्यंत खतरनाक असून याच्यावर अहमदनगर जिल्ह्यासह इतर विविध जिल्ह्यात एकूण ५० गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर,श्री.अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग,श्री.सुनिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगांव विभाग यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचेपोउपनि/समाधान भाटेवाल, पोलीस अंमलदार संदीप पवार, दत्तात्रय गव्हाणे,संतोष लोढे,संदीप दरंदले, संदीप चव्हाण,संतोष खैरे,प्रमोद जाधव, शिवाजी ढाकणे,अमृत आढाव,मयुर गायकवाड, मेघराज कोल्हे,चंद्रकांत कुसळकर यांनी केलेली आहे.