बोल्हेगाव येथील किड्स सेकंड होम प्री प्रायमरी स्कुल मध्ये पर्यावण दिन साजरा
नगर प्रतिनिधी:-विश्व निर्मल फौंडेशन संचलित किड्स सेकंड होम प्री प्रायमरी स्कुल मधे पर्यावरण दिना निमित्त पालकांच्या व शिक्षकांच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करुन पर्यावरण दीन साजरा करण्यात आला.
या वेळी प.पू.माताजी श्री निर्मला देवी यांचे प्रतिमेचे पूजन करुन यंदाच्या वर्षी संतुलित पर्जन्यवृष्टी होण्यासाठी प्रार्थना करन्यात आली. या वेळी शिक्षक व पालक यांच्या हस्ते वृक्षारोपण करन्यात येवून सर्वांनी लावलेल्या झाडाचे संगोपन करण्याचे सामूहिक वचन घेतले. विश्व निर्मल फौडेशन संस्थेचे कोषाध्यक्ष संदिप गांगर्डे, शुभम भालदंड, शाळेच्या मुख्याध्यापिका उषा गरड, उपमुख्याध्यापिका संगीता गांगर्डे, पर्यवेक्षक सौ. दिपाली हजारे, शाळेच्या शिक्षिका सौ रूपाली जोशी, सौ पूजा चव्हाण, सौ आरती हिवारकर, सौ अर्चना चव्हाण, वैष्णवी नजन, निकिता पाळंदे, सीमा हिवाळे आदि उपस्थित होते.