
अहमदनगर (दि.११ जुन प्रतिनिधी):-दि.४ जुन रोजी नगर मनमाड रोडवरील एमआयडीसी हद्दीतील सहयाद्री चौका जवळ हिरामोती पान सेंटर समोर एक इसम मयत अवस्थेत आहे.अशी माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनी/माणिक चौधरी यांना मिळाली होती मिळालेल्या माहिती नुसार एमआयडीसी सपोनी/चौधरी यांनी अमलदारांसह घटना ठिकाणी जाऊन सदर इसमास तात्काळ सिव्हील हॉस्पीटल येथे दाखल केले असता तो मयत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
यावरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यु दाखल करण्यात आलेला होता.दरम्यान मयत व्यक्ति स्टिफन अविनाश मिरपगार,वय-33 वर्ष,रा.आंधळे चौरे,नवनागापुर,ता.जि.हा असल्याचे समजले,जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सपोनी/माणिक चौधरी यांना सदरील घडलेल्या घटनेचे चौकशी करून तपास करण्याचे आदेश दिले.एमआयडीसी पोलीस अधिकारी यांनी सदर घटनेचा अधिक तपास सखोल व बारकाईने करुन घटना परिसरातील सी सी टी व्ही फुटेज,तांत्रिक विश्लेषन,साक्षीदार,गुप्तबातमीदार यांचे कडे तपास केला आला असता असे निष्पन्न झाले की,यातील मयत व त्याची पत्नी हे व्हिडीओ कॉलवरुन बोलत असतांना आरोपी यांन संशय आला की,मयत हा आपली व्हिडोओ शुटींग करत आहे याचा राग मनात धरुन आरोपी यांनी तु आमचा व्हीडीओ का काढतो असे म्हणुन शिवीगाळ व दमदाटी करुन मयत यास सिमेंट ब्लॉकचे साहयाने डोक्यात वार करुन जिवंत ठार मारले आहे त्यावरुन एम आय डी सी पो स्टे गुरनंा 502/2024 भादविकलम 302, 504, 506, 143, 147, 148, 149 प्रमाणे 5 आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयातील 3 आरोपीतांना ताब्यात घेण्यात आले असून दोन आरोपी विधीसंघर्षग्रस्त बालक असून त्यांना बाल न्यायमंडळ यांचे समक्ष हजर केले आहे.तसेच दोन आरोपी अद्यापही फरार आहेत.हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,नगर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी,पोलीस उपनिरीक्षक परदेशी, पोसई/भालेराव,पोहेकॉ/ साबीर शेख,पोना/महेश बोरुडे,पोना/ भागवत,संदीप चव्हाण,राजेंद्र सुद्रिक, पोकॉ/किशोर जाधव,पोकॉ/अक्षय रोहकले,पोकॉ/नवनाथ दहिफळे,तांत्रिक तपास नगर दक्षिण मोबाईल विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंडू यांनी केली आहे.