प्रवाशांची जीवघेणी कसरत थांबवा अन्यथा पुन्हा रस्त्यावर उतरू सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे
पारनेर (दि.१२ जुन प्रतिनिधी):-सार्वजनिक बांधकाम विभागाने भूमी अभिलेख कार्यालयाकडे नारायणगव्हाणच्या चौपदरीकरणासाठी मोजणीचे शुल्क तातडीने जमा करूनही भूमी अभिलेख कार्यालयाकडून कुठल्याही प्रकारची हालचाल होताना दिसत नाही.
नारायणगव्हाणकरांसह प्रवाशांचा महामार्गावर प्रवास अत्यंत जीवघेणा बनला असून वेळोवेळी प्रत्येक प्रशासकीय विभागाला पाठपुरावा करत गावच्या संवेदनशीलतेची प्रशासनाला जाणीव करून दिली असून प्रशासनाकडून दिरंगाई होत असून नारायणगव्हाणकरांनी सुरुवातीपासून प्रशासनाला सहकार्याची भूमिका ठेवली असून प्रशासकीय अधिकारी जबाबदारीने काम करताना दिसत नसून प्रशासनाकडून होणारा जीवघेणा हलगर्जीपणा घातक असून सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे,सचिन शेळके यांनी उपविभागीय अधिकारी गणेश राठोड श्रीगोंदा पारनेर भाग अहमदनगर यांची भेट घेऊन पस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून देत गावाला संकटातुन बाहेर काढण्यासाठी आपण लक्ष घालावे या संदर्भात भेट घेतली असता आपण संबंधित विभागांना पत्र दिले असून कार्यवाही सुरू असल्याचे प्रांताधिकारी गणेश राठोड यांनी सांगितले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे व सचिन शेळके यांनी शालेय विद्यार्थी,ज्येष्ठ नागरिक यांसह प्रवाशांची महामार्गावरील होणारी जीवघेणी कसरत थांबवायला हवी यावर उपविभागीय अधिकारी गणेश राठोड यांनी पुन्हा संबंधित विभागांना तातडीने स्मरणपत्र देत स्वतःया विषयाला न्याय देऊ असे सांगितले यावेळीप्रसार माध्यमांशी बोलताना सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे व सचिन शेळके यांनी जोपर्यंत प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत पाठपुरावा करत राहणार असल्याचे सांगितले.