शिवराम आर्यच्या मुलीला मुख्यमंत्र्यांकडून दोन लाखांची मदत जाहीर;मा.नगरसेवक धनंजय जाधव यांच्या प्रयत्नाला यश
अहमदनगर (दि.१५ जुन प्रतिनिधी):-शिवराम आर्य यांच्या लहान मुलीला मेंदूत गाठ निर्माण झाली आहे.तिच्या इलाजासाठी मोठा आर्थिक खर्च येणार आहे.शिवराम आर्य यांनी हिंदू धर्मात प्रवेश केल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्याशी संबंध तोडले आहे.त्यामुळे मुलीच्या वैद्यकीय खर्चासाठी नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळत नाही. शासकीय कागदपत्रांतील नावांत बदल नसल्याने कर्ज मिळविणेही त्यांना कठीण झाले आहे.
शिवराम आर्य यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे.अशा स्थितीत मुलीचा वैद्यकीय खर्च करता येत नसल्याने निराश झालेल्या शिवराम आर्य यांनी निराश होत; पुन्हा मुस्लिम धर्मात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती. शिवराम आर्य यांनी सात महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे बागेश्वर धाम यांच्या कार्यक्रमात सहकुटुंब हिंदू धर्मात प्रवेश केला होता.हे धर्मांतर राज्यभर गाजले होते.शिवराम आर्य यांची बातमी प्रसार माध्यमांतून येताच भाजपचे स्थानिक नेते सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहायक मंगेश चिवटे यांच्याशी संपर्क केला.
चिवटे यांनी या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून मुख्यमंत्री शिंदे यांना या प्रकरणा विषयी सांगितले.त्यानुसार मुख्यमंत्री शिंदे यांनी आज मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून शिवराम आर्य यांच्या बँक खात्यात निधी वर्ग करण्याचे लिखित आदेश दिले आहेत.त्यामुळे शिवराम आर्य यांना त्यांच्या मुलीच्या वैद्यकीय खर्चासाठी आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे.माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी केलेल्या प्रयत्नाला यश आले आहे शिवराम आर्य यांनी धनंजय जाधव यांचे आभार मानले.जाधव यांच्या कार्याचे शहरात सर्वत्र ठिकाणी कौतुक होत आहे.