पंचशील विद्या मंदिर प्राथमिक शाळेत पहिल्या दिवसाची सुरुवात विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प व पाठ्यपुस्तकाचे वाटप करून
अहमदनगर (१५ जुन प्रतिनिधी):-जून महिना म्हटलं की,विद्यार्थ्यांची शाळेची धावपळ शाळा सुरू त्यातच विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तसेच संस्थापक दा.भि.गायकवाड गुरुजी यांनी स्थापन केलेल्या नगर शहरातील सिद्धार्थ नगर येथील पंचशील विद्या मंदिर प्राथमिक शाळा या ठिकाणी शाळेचा आज १५ जुन पहिला दिवस हा खून छान साजरा करण्यात आला पहिलीच्या विद्यार्थी यांचाही पहिला दिवस विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करून बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले.
यावेळी युवानेते सुरेशभाऊ बनसोडे,पंचशील विद्या मंदिर शाळेचे अध्यक्ष सुमेध गायकवाड,विश्वस्त सारंग पाटेकर,विश्वस्त भीमराव पगारे सर, मुख्याध्यापक उकिर्डे सर,उंडे सर,श्रीमती. गोसावी मॅडम,श्रीमती. वांगणे मॅडम,श्रीमती. शिरसाठ मॅडम,साबळे सर,श्रीमती.तिवारी मॅडम व सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.