Maharashtra247

बकरी ईद सणानिमित्त नगर पुणे छ.संभाजी नगर महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवणार जिल्हा पोलिस अधीक्षकांचे आदेश

अहमदनगर (दि.१५ जुन प्रतिनिधी):-बकरी ईद सणानिमित्त कोठला ईदगाह मैदान येथे नमाज पठण करण्यात येणार असल्याने नगर पुणे औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे.दि.१७ जुन २०२४ रोजी (चंद्र दर्शनानुसार एक दिवस पुढे मागे या दिवशी मुस्लीम बांधवांचा बकरी ईद सण असल्याने कोठला ईदगाह मैदान या ठिकाणी नमाज पठण करण्यात येणार आहे. सदर इदगाह मैदान हे नगर पुणे महामार्गालगत आहे.त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांच्या कर्कश आवाज/हॉर्न यामुळे नमाज पठणात व्यत्यय येतो.

तसेच मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होवु नये व कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरीता वाहतुकीचे नियमन करणे आवश्यक आहे.मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३(१) (ब) नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन आदेशात नमुद केलेल्या वेळेकरीता व ठिकाणी पुढील प्रमाणे वाहतुक वळविणेबाबत नियम आदेश जारी करीत आहे.

१)एस पी ओ चौक, न्यायनगर मार्गे,बेलेश्वर चौक,किल्ला चौक,जीपीओ चौक, चांदणी चौक मार्गे 

२)जी पी ओ चौक, किल्ला चौक,बेलेश्वर चौक,न्याय नगर मार्गे, एसपीओ चौकाकडे तसेच छ.संभाजीनर (औरंगाबाद) रोड कडून येणारी जड व इतर सर्व प्रकारची चारचाकी वाहने हे अ.नं.१ मार्गे व पुणे रोडकडून येणारी जड व इतर सर्व प्रकारची वाहने अ.नं.२ मार्गे वळविणे बाबतचा आदेश दिनांक १७/०६/२०२४ रोजी सकाळी ०७:०० ते १२:०० वाजे पावेतो (चंद्र दर्शनानुसार एक दिवस पुढे मागे जारी राहील.

प्रस्तुत आदेश हा शासकीय वाहने,नमाज पठणाकरीता येणारे नागरीक,अॅम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड व स्थानिक प्रशासनाने अत्यावश्यक कारणास्तव परवानगी दिलेल्या वाहनांना लागू राहणार नाही.असे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आदेशात म्हटले आहे.

You cannot copy content of this page