हाफ मर्डर मधील फरार आरोपी तलवारीसह जेरबंद तोफखाना पोलिसांची कारवाई
अहमदनगर (दि.१६ जुन प्रतिनिधी):-नगर शहरातील तपोवन रोड युनिटी ग्राउंड येथे हातामध्ये तलवार घेवुन फिरणाऱ्या एकाला तोफखाना पोलीस ठाण्याच्या पथकाने ताब्यात घेतले.उत्कर्ष सुनिल गाडे असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एक इसम हातात तलवार अवैध्यरित्या घेऊन फिरत आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहीती तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळाली या माहितीच्या आधारे तोफखाना पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तपोवन रोड युनिटी ग्राउंड येथे जाऊन सापळा लावला असता पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला मोठ्या शिताफिने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपीची दोन पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडे तलवार व चॉपर आढळून आल्याने ते जप्त करण्यात आले.ताब्यात घेतलेला आरोपी हा 307 व आर्म ॲक्ट या गुन्ह्यात फरार असल्याचे आढळून आल्याने या गुन्ह्याच्या तपासाकामी त्याला अटक करण्यात आली असून अधिक तपास तोफखाना पोलीस करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील,दत्तात्रय जपे, सुनिल शिरसाठ, अहमद इनामदार, दिनेश मोरे, भानुदास खेडकर, संदिप धामणे, वसिम पठाण, सुमित गवळी, सतिष त्रिभुवन, शिरिष तरटे, दत्तात्रय कोतकर, सतिष भवर, बाळासाहेब भापसे यांनी केली.