अहमदनगर…इलेक्ट्रिक दुचाकी चार्जिंग होत असताना शॉर्टसर्किट दोन दुचाकी जळून खाक
अहमदनगर (दि.१७ प्रतिनिधी):-अहमदनगर जिल्ह्यातील राहता शहरात शनिवारी दि.१५ जुन रोजी रात्री बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रिक दुचाकी चार्जिंग होत असताना शॉर्टसर्किट झाल्याने दुचाकीला अचानक आग लागली. त्यामुळे इलेक्ट्रिक दुचाकी जवळ असलेली दुसर्या दुचाकीला देखील आग लागल्याने छोट्या आगीचे रूपांतर मोठ्या आगीत झाले. मात्र शेजारील नागरिकांच्या व नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाच्या कर्मचार्यांच्या तत्परतेमुळे आगेवर वेळीच नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला.
आगीत दोन्ही दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या. राहाता शहरातील शनी मंदिर परिसरात समद व समीर खाटीक हे दोन एकत्र कुटुंबात राहतात. शनिवारी रात्री त्यांच्या जवळ असलेली इलेक्ट्रिक दुचाकी रात्री ११ वाजे दरम्यान चार्जिंग करण्यासाठी लावून झोपण्यास गेले.रात्री १२ वाजे दरम्यान अचानक खाटीक कुटुंबीयांना आग लागल्याचे जाणवले. रस्त्यावरून जाणार्या नागरिकांना देखील त्यांच्या घरात आग लागली हे लक्षात आल्याने नागरिकांनी तात्काळ आग विझवण्याचा प्रयत्न केला.
परंतु इलेक्ट्रिक दुचाकी जवळ असलेली त्यांची प्लॅटिना कंपनीच्या दुसर्या दुचाकीला देखील आग लागली. शेजारील नागरिकांनी तात्काळ अग्निशामक विभाग प्रमुख अशोक साठे यांना फोन करून सदर घटनेची माहिती दिली.अग्निशामक येईपर्यंत नागरिकांनी जवळच असलेल्या पाणी भरलेल्या टाक्यांमधून बादलीद्वारे पाणी मारून आग विझवण्याचा प्रयत्न केला.मात्र या घटनेत कुठली प्रकारची जीवित हानी झाली.