तरुणांना रोजगार मिळवून देणारा अभिनव उपक्रम कोणता आहे उपक्रम वाचा सविस्तर
पाथर्डी प्रतिनिधी (राहुल बांगर):-महाविद्यालयाचा निकाल लागला कि,युवकांना मुलाखतीचे वेध लागतात.लिंकेडीन, नौकरी डॉट कॉम किंवा अन्य मार्गाने युवकांना त्यांना अपेक्षित जॉब मिळावा अशी अपेक्षा असते.बऱ्याचदा हा नोकरी शोधाचा प्रवास काही वर्षही चालतो त्यातून युवकांना नैराश्य येते आणि शिक्षित पण बेरोजगार असा शिक्का त्याला समाजातून मिळतो.या समस्येला केंद्रबिंदू मानून महास्कील टेक इनोवेटिव फौंडेशनने नागपूरच्या एजूनेट संस्थेशी समन्वय करून नगरमधील तरुणांना मोफत ऑफिस मॅनेजमेंट अँड एम्पलोयबिलीटी प्रोग्राम देण्यास या शैक्षणिक वर्षापासून सुरुवात केलेली आहे.
चला जाणून घेऊयात या अभिनव उपक्रमाबद्दल!
Management & Entrepreneurship and Professional Skills Council (MEPSC) या संस्थेने पुढाकार घेऊन हा प्रोग्राम डिझाईन केला असून विद्यार्थ्यांना रोजगार कौशल्य सहज आत्मसात करता यावेत म्हणून दहा घटकांमध्ये अध्ययन साहित्याची निर्मिती केली आहे.ज्यामध्ये संगणकाच्या सहाय्याने ऑफिस रुटीन सांभाळणे,मुलभूत इंग्रजी कौशल्य,करिअर डेवलपमेंट-ध्येय निश्चिती,संवाद कौशल्य,समस्या सोडवण्याचे कौशल्य, कार्यलयीन सहकार्यांचे नियोजन,आर्थिक साक्षरता,मुलभूत डिजिटल कौशल्य,ग्राहक सेवा आणि मुलाखतीचे तंत्र इत्यादी युवकांच्या जीवनाला दिशा देणाऱ्या घटकांचा अंतर्भाव आहे.तसेच हा एम्पलोयबिलीटी प्रोग्राम विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्याच महाविद्यालयात उपलब्ध होणार असून,दोन महिन्याच्या कोर्स कालावधीसाठी तज्ञ मार्गदर्शक देखील उपलब्ध असणार आहेत.
हा कोर्स कुणासाठी आहे?
ओबीसी/वी.जे.एन.टी./एस.बी.सी.प्रवर्गातील किमान बारावी उत्तीर्ण असणाऱ्या कोणत्याही शाखेतील विद्यार्थ्याला सदर कोर्ससाठी त्याच कॉलेजच्या प्रशासनाला विनंती करून हा मोफत कोर्स जॉईन करता येईल.तसेच कॉलेज देखील स्वयं प्रेरणेने संस्थेशी जोडून विद्यार्थी हितार्थ हा कोर्स सुरु करू शकते.
कॉलेजसाठी हा कोर्स का महत्वाचा आहे?
कॉलेजची शैक्षणिक प्रतिमा उंचावण्यात या प्रोग्रामची खूप मदत होणार आहे.MEPSC, NSDC आणि महाज्योती या शासन संस्थाचे सर्टिफिकेशन या कोर्सच्या माध्यमातून कॉलेजला मिळून जाईल तसेच विद्यार्थी एडमिशनसाठी देखील हा एक कॉलेजचा USP असेल.इंडस्ट्री मधल्या नामांकित पार्टनर सोबत कॉलेजचा परिचय होऊन विध्यार्थ्यांचा प्लेसमेंट रेट देखील वाढेल,पर्यायाने कोलेजच्या यश शिखरात एक मानाचा तुरा रोवला जाईल.गत शैक्षणिक वर्षात एजुनेट संस्था,नागपूर मार्फत २० हजार पेक्षा जास्त युवकांना या एम्पलोयबिलीटी प्रोग्रामचा मोफत लाभ झाला असून,आपण शिक्षण घेत असलेल्या कॉलेजमध्ये हा प्रोग्राम सुरु करण्यासाठी संस्थेच्या mahaskilltifoundation@gmail.com या मेलवर प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन महास्कील संस्थेचे संचालक राहुल बांगर यांनी केले असून अधिक माहितीसाठी ९०१११७३७०० या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करावा.