कळसुबाई शिखर सर करताना तरुणाचा यामुळे झाला मृत्यू
संगमनेर दि.२४ जुन (राजेंद्र मेढे):-कळसूबाई शिखर सर करत असताना एका तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुजरात येथील नेमीन नरेशभाई पटेल (वय २३, रा बलसाड) याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली.
बलसाड (गुजरात) येथील काही मुलांचा ग्रुप कळसूबाई शिखरावर चढाई करण्यासाठी रविवारी आला होता.सर्व मित्र कळसूबाई शिखर सर करत असताना नेमीन याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.पोलिसांना घटनेची माहिती समजतात सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेडकॉ/दिलीप डगळे व इतर घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी त्याचा मृतदेह पायथ्याशी आणला.दोन दिवसांपूर्वी भंडारदरा धरणात पोहोण्यासाठी गेलेल्या शिर्डी येथील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असताना आणखी एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.