Maharashtra247

समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन;काळाराम मंदिर तसेच हिंदू मंदिरांमध्ये अनुसूचित जातीतील नागरिकांना व शूद्रांना दर्शनास प्रवेश बंदीचा निषेध;जातीय तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींवर कारवाई करा

अहमदनगर (प्रतिनिधी)-नाशिक येथील काळाराम मंदिर तसेच हिंदू मंदिरांमध्ये अनुसूचित जातीतील नागरिकांना व शूद्रांना दर्शनास प्रवेश बंदी करण्यात यावी असे वादग्रस्त व जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना करून सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रकार एका समाजकंटकाने केला आहे. तो अतिशय निंदनीय प्रकार असून अहमदनगर जिल्ह्यातील समस्त आंबेडकरी चळवळीतील समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले .

यावेळी अशोकराव गायकवाड, सुरेश बनसोडे, सुमेध गायकवाड, अजय साळवे, सुनील क्षेत्रे, योगेश साठे, रोहित आव्हाड, नगरसेवक राहुल कांबळे, संजय खामकर, प्रमोद आढाव, आप्पासाहेब मकासरे, नितीन कसबेकर, गौतमी ताई भिंगारदिवे, प्रा. प्रमोद सूर्यवंशी, संजय साळवे, श्याम यादव, शेखर पंचमुख, अंकुश मोहिते, येशुदास वाघमारे, किशोर उल्हारे, सतीश साळवे, अण्णासाहेब गायकवाड, आदित्य भिंगारदिवे, जयेश गायकवाड, विश्वास केदारे, प्रमोद गायकवाड, अनिकेत साळवे, विजय भिंगारदिवे, स्वराज भिंगारदिवे, कौशल गायकवाड, सुरेश भिंगारदिवे,यादव भिंगारदिवे, विशाल भिंगारदिवे, अविनाश राक्षे, निलेश बांगरे, आकाश जाधव, दीपक सरोदे, सिद्धेश आठवले, नवीन भिंगारदिवे, अण्णासाहेब गायकवाड, राम गायकवाड, विशाल गायकवाड, निखिल साळवे, गणेश गायकवाड, विनीत पाडळे, विजय गायकवाड, विशाल गायकवाड, सिद्धांत गायकवाड, प्रतिक सोनवणे, अक्षय बोरुडे, संघराज गायकवाड, अनिकेत गायकवाड , शिवम झेंडे , संकेत बारस्कर , सिद्धार्थ पवार, अजय घाटविसावे,दीपक पाटोळे, लक्ष्मण माघाडे आदीसह आंबेडकर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने सांगण्यात आले की, हा घडलेला प्रकार निंदनीय असून वादग्रस्त वक्तव्य व जातीय ते निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कोठारात कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये समस्त आंबेडकर समाज हा मतदानाविषयी निर्णय घेणार असल्याचे सांगितले व सर्वांनी तीव्र स्वरूपात आपल्या भावना व्यक्त केले व आंबेडकरी चळवळीतील समाजाच्या वतीने व अनुसूचित जाती मधील जनतेच्या वतीने तीव्र शब्दात जाहीर निषेध करून त्या समाजकंटकावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

You cannot copy content of this page