अरे बापरे…चक्क.मा.आमदाराला ब्लॅकमेलिंग करत खंडणीची मागणी तथाकथित पत्रकारावर कोतवालीत गुन्हा दाखल
अहमदनगर (दि.२८ जून):-बीड जिल्ह्यातील एका मा.आमदाराला ब्लॅकमेलिंग करून १ कोटी २५ हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या तीन जणांवर नगर शहरातील एका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
यामध्ये एक वेब पोर्टल youtube चालणारा इसम असून त्या इसमाने २५ हजार रुपये घेतली ही होते.
त्या मा.आमदाराला तुमची अश्लील व्हिडिओ आमच्याकडे आहे ती व्हायरल करायची नसेल तर १ कोटी २५ हजार रुपये द्यावे लागतील अशी खंडणीची मागणी करून दोन महिलांसह एका युट्युब पोर्टल चालवणाऱ्याने माजी आमदाराला ब्लॅकमेलिंग केले होते.मात्र अखेर या ब्लॅकमेलिंगला कंटाळून या माजी आमदारांनी नगर शहरातील एका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दोन महिलांसह या युट्युब पोर्टल चालवणाऱ्या इसमाने अनेक दिवसांपासून माजी आमदारांना तुमची व्हिडिओ क्लिप आमच्याकडे असून ती सोशल मीडिया व्हायरल करायची नसेल तर एक कोटी रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली होती.