आयुक्त पंकज जावळे यांच्यावर कारवाई झाल्याने मनपात फटाके वाजवून पेढे वाटणाऱ्यांवर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा समस्त आंबेडकरी समाजाची मागणी
अहमदनगर (दि.२८ जून):-अहमदनगर महानगर पालिकेचे आयुक्त डॉ.पंकज जावळे यांच्यावर जालना लाचलुचपत विभागाने लाच मागणी प्रकरणी दि.२७ जुन रोजी रात्री उशिरा शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
यात मागासवर्गीय बौद्ध अधिकारी आयुक्त पंकज जावळे यांचे नाव समोर आले असल्याने काही जातीवादी प्रवृत्तीनी महापालिकेबाहेर फटाके फोडले तर कोणी पेढे वाटले,काहींनी पत्रकार परिषद घेऊन आनंद व्यक्त केला,तर काहींनी सोशल मीडियावर आदळ आपट केली हा असुरी आनंद शहरातील काही विशिष्ट महाभागांनी साजरा केला.
याच गुन्ह्यात पकडण्यात आलेले पाच ते सहा जणांना शासकीय विश्रामगृहात नेऊन पुन्हा सोडण्यात आले ही बाब संशयास्पद आहे असे आंबेडकरी समाजाच्या वतीने आज पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.यात आयुक्त दोषी आहेत की नाही हा न्यायप्रविष्ट भाग राहिला.पण यानुषंगाने अनेक प्रश्न उपस्थित होताहेत ते असे की,एखाद्या अधिकाऱ्यावर नगर शहरात लागणारा हा पहिलाच ट्रॅप होता का..? याआधी ही महापालिकेत अनेकांवर कारवाई झाल्या… पण यंदाचा ट्रॅप मागासवर्गीय बौद्ध अधिकाऱ्यावर लावला असल्या कारणाने एका बौद्ध अधिकाऱ्याने अनेक वर्षापासून रखडत असलेला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळाचे काम मार्गी लावले,शहरात छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यासारखे अनेक महापुरुषांच्या पुतळ्यांचे काम मार्गी लावणारे मनपा आयुक्त जावळेच होते,आपल्या कामाच्या बाबतीत कुठलीही हय गय न करणारा डॅशिंग अधिकारी म्हणून त्यांची शहरात ओळख आहे.
पण अधिकारी मागासवर्गीय अन त्यातल्या त्यात बौद्ध असल्याने त्यांच्या समोर झुकणे यांना मान्य नव्हते यासाठीचा हा ट्रॅप लावण्यात आला असल्याचा आरोप या वेळी पत्रकार परिषदेत करण्यात आला.पंकज जावळे यांच्यावर कारवाई झाली म्हणूनच हा असुरी आनंद साजरा करणाऱ्यात आला असे आमचे स्पष्ट मत आहे. सदरील घटनेमुळे शहरातील तमाम आंबेडकरी समाजाच्या भावना दुखवल्या असून अन त्याच अनुषंगाने शनिवारी जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन संबंधित फटाका वाजवणारे सोशल मीडियावर पोस्ट करणारे यांच्यावर ॲट्रॉसिटी अॅक्ट प्रमाणे कारवाई करण्याची मागणी समस्त आंबेडकरी समाज करणार आहे.
या पत्रकार परिषदेला सिध्दार्थ आढाव,सुशांत म्हस्के,पवन भिंगारदिव,सुनिल क्षेत्रे,बंडु आव्हाड,प्रतिक बारसे,सुमेध गायकवाड,संजय कांबळे,कोशल गायकवाड,विशाल भिंगारदिवे,अजय साळवे,संजय जगताप,संदिप वाघचौरे,विशाल गायकवाड,पोपट जाधव,विजय गायकवाड,जय कदम,विनित पाडळे,गणेश गायकवाड,सोनू शिंदे,दानिश शेख,आंबेडकरी समाजातील आदी समाज बांधव उपस्थित होते.