Maharashtra247

सरपंचांच्या विविध मागण्यासाठी सरकार सकारात्मक बाबासाहेब पावसे 

 

संगमनेर (प्रतिनिधी राजेंद्र मेढे):-आझाद मैदानावर सरपंच उपसरपंच यांचे मोर्चा धरणे आंदोलन संगमनेर प्रतिनिधी सरपंच सेवा संघ संपुर्ण महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे याच्या माध्यमातून राज्यभर वृक्षलागवड उपक्रम आदर्श निर्माण करणारण्यासाठी जनजागृती गोरगरीब मुलांना वह्या दप्तरी वाटप समाज उपयोगी उपक्रम नियमित राज्यभरात सुरू असतात.

तसेच वेगवेगळ्या योजना सर्व सामान्य माणसापर्यंत पोहण्यासाठी सरपंच उपसरपंच अहोरात्र मेहनत करून आम जनतेला दिलासा देण्यासाठी प्रयत्न नियमी करत आहे महाराष्ट्रातील सरपंच उपसरपंच सदस्यांच्या विविध मागण्यासाठी आझाद मैदानावर मोर्चा धरणे आंदोलन सरपंच संघटीत चळवळीचे नेतृत्व बाबासाहेब पावसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यावेळी राज्यभरातील सरपंच उपस्थित होते यावेळी सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्या अशी मागणी स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने अनेक दिवसांपासून सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे या मागण्यासाठी अनेक आंदोलने करण्यात आली परंतू सरकारने दखल घेतली नव्हती आज ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी आझाद मैदानावरील आंदोलनाची दखल घेऊन सरपंचाच्या मागण्याबाबत सकारात्मक आहे असे शिष्टमंडळाला सांगितले.

लवकरच मंत्रालयात आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली आहे सरपंच संघटना प्रयत्नशील आहे अनेक वर्ष राज्यातील सर्व सरपंच उपसरपंच यांच्या वतीने सरपंच संघटीत चळवळीचे नेतृत्व बाबासाहेब पावसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा सुरू होता आझाद मैदानावरील आंदोलकांची दखल घेऊन सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ तसेच सरपंच पदाच्या कार्यकाळात दहा लाखाचे विमा संरक्षण पंचायत समिती जिल्हापरिषद मुबई सरपंच भवन पंचायत समितीमध्ये सरपंच ग्रामसेवक यांची संयुक्त मासिक बैठक आयोजित करणे सरपंचावर हल्ला करणाऱ्यावर विशेष संरक्षण कायदा करावा राज्यातील आजी माजी सरपंच उपसरपंच यांचे थकीत मानधन तत्काळ वर्ग करावे करण्याचे आश्वासन यावेळी वेळी देण्यात आले.

यासाठी मंत्रालयात मंत्रीमहोदय सचिव समवेत सरपंच शिष्टमंडळाशी बैठक होणार आहे यामध्ये सरपंच उपसरपंच यांच्या मागण्यांबाबत सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून लवकरच सरपंच उपसरपंच यांच्या मागण्या मान्य करण्याचे धोरण सरकारकडून सुरू आहे यासाठी सरपंच सेवा संघाचा पाठपुरावा सुरू आहे सरपंच उपसरपंच यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत हा लढा सुरू राहणार आहे अशी माहिती सरपंच शिष्टमंडळाने दिली आहे यामध्ये आदर्श सरपंच अशोक ओव्हाळ विजय पाटील अविनाश पवार नंदकुमार कदम अरूण खरमाटे डॉ तान्हाजी पाटील सौ.पुजा जाधव जानु गायकर लता खोत सह राज्यातील हजारो सरपंच या आंदोलनात सहभागी झाले होते.आंदोलन यशस्वी करण्यासाठी सरपंच संजय काळे बाबाजी गुळवे निलेशकुमार पावसे सोमनाथ नाडे रोहित पवार अमोल शेवाळे रविंद्र पवार सुरेश गडाख यांनी परिश्रम घेतले.

You cannot copy content of this page