अस्वस्थ तरुणाईशी उद्या तीन पद्मश्रींचा संवाद, प्रवेश सर्वांना खुला..युवा संवादात सहभागी होण्याचे स्नेहालय संस्थेच्या युवा निर्माण प्रकल्पाचे आवाहन
अहमदनगर (दि.७ जुलै):-‘देशापुढील वर्तमान आव्हाने आणि तरुणाईची सामूहिक जबाबदारी’ या विषयावर देशातील तीन नामांकित पद्मश्री पुरस्कार प्राप्त कर्मवीर तरुणाईशी उद्या संवाद करणार आहेत.या युवा संवादात सहभागी होण्याचे आवाहन स्नेहालय संस्थेच्या युवा निर्माण प्रकल्पाने केले आहे.
राजस्थान मधील राजसमंद जिल्ह्यात पिपलांत्री हे आदर्श गाव दोन दशके समर्पित कार्य करून ग्रामविकासाचे मॉडेल म्हणून विकसित करणारे पद्मश्री डॉक्टर शामसुंदर पालीवाल यावेळी संवाद करतील,पद्मश्री पोपटरावजी पवार,पद्मश्री तसेच रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त नीलिमा मिश्रा यांचाही संवाद यावेळी होणार आहे.२००६ साली मुलीच्या आकस्मित निधनानंतर पंचक्रोशीत मुलीचा जन्म झाल्यावर १११ वृक्षांच्या लागवडीची चळवळ डॉ.श्यामसुंदर पालीवाल यांनी सुरू केली.ग्रामविकास, पर्यावरण तसेच सद्यस्थितीतील आव्हाने व आपली सामूहिक जबाबदारी याविषयीचे त्यांचे आणि पोपटराव पवार यांचे मार्गदर्शन व पथदर्शी विचार या युवा संवादादरम्यान ऐकता येईल.पद्मश्री नीलिमा मिश्रा महिला सक्षमीकरणाचे अनोखे प्रयोग करीत आहेत.
हा कार्यक्रम सोमवार, दि.८ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ठीक ४ वा. “स्नेहांकूर दत्तक विधान केंद्र”,मॅकडोनाल्ड मागे,केडगाव,अहमदनगर येथे आयोजित केला आहे.कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून युवानिर्माण प्रकल्पाने या युवासंवाद कार्यक्रमात सहभागी होण्याचे सर्वांना आवाहन केले आहे. संपर्क-9011026472/8275899959