Maharashtra247

कोतवाली पोलिसांचा फिल्मी स्टाईल थरार बोलेरो गाडीचा पाठलाग करून गोवंशीय जनावरांची केली सुटका;पोलिसांच्या मदतीला आलेल्या इसमाला आरोपीने केले जखमी

 

अहमदनगर (दि.८ जुलै):-कोतवाली पोलिसांच्या पथकाने वाहनाचा पाठलाग करुन बोलेरो पिकअप चालकाससह इतर ३ साथीदारांना शहरातील अशोका हॉटेल जवळ, झेंडीगेट येथे फिल्मी स्टाईलने ताब्यात घेऊन तब्बल १ लाख १२,०००/-रुपये किमतीच्या गोवंशीय वासरे ताब्यात घेऊन सुटका केली.

केडगाव हददीत कोतवाली पोलीस पेट्रोलिंग करत असताना पहाटे तीनच्या सुमारास पोनि/प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली की,सुप्याकडुन अहमदनगरच्या दिशेने एका महिंद्रा कंपनीचा बोलेरो पिकअप गोवंशीय वासरे घेवुन जात आहे या बाबत गोपनीय बातमी मिळाली पोनी/दराडे यांनी पोलीस पथकाला सदर गोवंशीय वासरे वाहतुक भरून जाणाऱ्या बोलेरो पिकअपची खात्री करुन कारवाई करणेबाबत सुचना दिल्या,कोतवाली पोलीस स्टेशनचे पथक अंबिका हॉटेल जवळ, सोनवाडी चौक केडगांव येथे गाडी येण्याची वाट पाहत असताना बोलेरो पिकअप पहाटेच्या सुमारास त्या ठिकाणी आली पिकअप वरील चालकास पथकाने थांबवण्यासाठी हाताचा इशारा केला असता चालकाने पोलीस पथक व पोलीस स्टाफ तसेच पंच यांच्यावर जीव घेण्याचे उददेशाने अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी पोलीस पथक जीव वाचविण्यासाठी रस्त्याचे बाजुला झाले.तसेच सोबत मदतीसाठी असणारे निरंजन कारले यांचे हातावर सदर पिकअपमध्ये चालकाच्या शेजारी बसलेल्या इसमाने काहीतरी धारदार वस्तुने मारहाण करून जखमी केले व पिकअप भरधाव वेगात अहमदनगरच्या दिशेने घेवुन गेला.पोलिसांच्या पथकाने वाहनाचा पाठलाग करुन बोलेरो पिकअप चालकास अशोका हॉटेलजवळ, झेंडीगेट येथे पकडुन पिकअप रस्त्याचे बाजुला थांबवुन त्यांना ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेला इसमांना त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव आलक्या कृष्णा काळे,संदीप आलक्या काळे,आलेश काळे,अशोक आलक्या काळे (चालक) (सर्व रा.औसरी खुर्द ता. आंबेगांव) असे असल्याचे सांगितले.

त्यावेळी टेम्पोची पाहणी केली असता महिंद्रा कंपनीचा पिकअप त्यामध्ये जिवंत गोवंशीय वासरे कत्तल करण्याचे उददेशाने विना परवानगी निर्दयतेने वाहतुक करताना मिळुन आले. त्यांच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे,पोलीस जवान दिपक रोहोकले,राजेंद्र पालवे,तानाजी पवार,सत्यम शिंदे,सुरज कदम,पोहेकॉ/खराडे, पोकॉ/गावडे यांनी केली आहे.

You cannot copy content of this page