वारकऱ्यांन समवेत टाळ मृदुंगाच्या गजरात एमआयडीसी पोलिसांनी केला हरिनामाचा गजर;वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला भेटली हे आमचे भाग्यच-सपोनी माणिक चौधरी
अहमदनगर (दि.७ जुलै):-पायी जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठल सेवा मानली जाते. या सेवेपासून अहमदनगर मधील पोलीस देखील लांब राहिलेले नाहित.
गेल्या ४५ वर्षापसुन सलग मालेगावहून येणाऱ्या सिद्धेश्वर महाराज यांच्या दिंडीची सेवा अहमदनगर येथील पोलिस दरवर्षी करतात.एवढेच नाही तर वारकऱ्यां समवेत टाळ मृदुंगाच्या गजरात पोलिसही हरिनामाचा गजर करतात.महाराष्ट्राचे आध्यात्मिक वैभव असलेल्या वारीच्या परंपरेत सर्व समाज घटक उच्च निच भेद विसरून सहभागी होतात.पंढरीचा विठोबा त्यांच्या साठी मायबाप असतो.कर्तव्य बजावत असल्याने पोलिसांना घरी वेळ देता येत नाही.
त्यामुळे त्यांच्या साठी वारी करणे शक्यच नसते.अशावेळी अहमदनगर मधील एमआयडीसी पोलिस ठाण्याकडून गेल्या ४५ वर्षापासून दिंडीचे स्वागत करण्यात येते. दिंडी जवळ आल्यावर पोलिसांची गाडी तिच्या स्वागताला जाते.अधिकारी कर्मचारी बदलून गेले तरी नवीन आलेले अधिकारी पोलिस ठाण्याची हि परंपरा पाळत आहेत. वारकऱ्यांसमवेत टाळ मृदुंगाच्या गजरात पोलिस हरिनामाचा गजर करतात.भजन,भारुड,कीर्तन करीत पोलिस विठूनामाच्या जयघोषात दंग होत असल्याच दिसून येत.पोलिसच नव्हे तर त्यांचे कुटुंबीयही या स्वागत सोहळ्यात सहभागी होतात.
खाकी वर्दी म्हटलं कि कर्तव्य कठोर अधिकारी आणि कर्मचारी अस चित्र समोर येत.मात्र अहमदनगर मधील हे पोलिस खाकी वर्दीच्या आत दडलेल्या भक्तीच दर्शन घडवतात. वारकऱ्यांच्या मुक्कामाची आणि भोजनाची व्यवस्था पोलिस ठाण्यातील सर्व कर्मचारी वर्गणी करून करतात.वारकऱ्यांमध्ये पांडुरंग पाहून त्यांची सेवा करून पोलिस पुण्याच काम करतात.
यावेळी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनी/माणिक चौधरी म्हणाले की जिल्हा पोलीस दलातर्फे वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला भेटली हे आम्ही आमचे भाग्यच समजतो.यावेळी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.