स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई तब्बल १० लाख रुपये किमतीच्या चोरलेल्या १०० ग्रॅम सोन्यासह चौघांना घेतले ताब्यात
अहमदनगर (दि.६ जुलै):-अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी व कोपरगाव परिसरात चैन स्नाचिंग करणारे सराईत आरोपींना तब्बल दहा लाख रुपये किमतीच्या 100 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दागिन्यासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मोठे यश आले आहे.
बातमीची हकीगत अशी की,दि.१ जून २०२४ रोजी फिर्यादी गिता गोंविदराज नटराजन,रा.तिरुपती स्ट्रीट,सौकारपेट,चेन्नई व त्यांचे पती असे साईबाबा समाधी दर्शना करीता पिंपळवाड़ी रोडने पायी जात असतांना समोरुन अनोळखी २ इसम मोटार सायकलवर येवुन मोटार सायकलवर पाठीमागे बसलेल्या इसमाने फिर्यादीचे गळ्यातील ९,००,०००/- रुपये किंमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन व २० ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र ओढुन तोडून बळजबरीने चोरुन घेवुन गेले बाबत.शिर्डी पो.स्टे. येथे गुःर.नं. ३८७/२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०४ (२), ३ (५) प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे.सदरची घटना घडल्या नंतर श्री.राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री. दिनेश आहेर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन चैन स्नचिंग गुन्ह्यांचा समांतर तपास करुन,गुन्हे उघडकीस आणणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/हेमंत थोरात, अंमलदार दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, रविंद्र कर्डीले,संदीप पवार,मनोहर गोसावी, देवेंद्र शेलार,संदिप चव्हाण,अमृत आढाव, अरुण मोरे व महिला अंमलदार भाग्यश्री भिटे अशांचे पथक नेमुन चैन चैन स्नाचिंगचे गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपींकडे तपास करुन गुन्हे उघडकीस आणणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकस रवाना केले होते.स्थागुशा पथक शिर्डी, राहाता व लोणी परिसरात झालेल्या चैन स्नॅचिंग घटना टिकाणी भेट देवुन,घटना ठिकाणचे व आजु बाजूचे सीसीटीव्ही फुटेज संकलीत करुन,त्याव्दारे आरोपींची ओळख पटवुन गुन्ह्याचा तपास करत असताना स्थागुशा पथकास गुप्तबातमीदारा मार्फत वर नमुद गुन्हा हा आरोपी नामे योगेश सिताराम पाटेकर रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपूर याने त्याचे साथीदारासह केला असून तो त्याचे साथीदारासह चोरी केलेले सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी अशोकनगर फाटा,ता. श्रीरामपूर येथे विना क्रमांकाचे काळ्या रंगाच्या युनिकॉर्न मोटार सायकलवर येणार आहे.
अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने लागलीच बातमीतील नमुद ठिकाणी अशोकनगर फाट्याजवळील रेल्वेच्या पुलाजवळ २ मोटार सायकल जवळ बातमीतील वर्णना प्रमाणे ३ पुरुष व १ महिला संशयीत रित्या उभे असलेले दिसले. पथकाची खात्री होताच चारही संशयीतांना शिताफीने ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेल्या संशयीतांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे योगेश सिताराम पाटेकर वय २२,रा.वडाळा महादेव,ता.श्रीरामपूर, राहुल माणिक अमराव वय २६,रा.अशोकनगर, ता.श्रीरामपूर,योगेश बाबुराव नागरे वय २४, रा. मनोली ता.श्रीरामपूर व पद्मा अशोक पिंपळे वय ४०,रा.अशोकनगर, ता.श्रीरामपूर असे असल्याचे सांगितले.ताब्यातील संशयीतांची पंचासमक्ष अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीमध्ये तुटलेले सोन्याचे दागिने वरोख रक्कम मिळन आल्याने आरोपीकडे नमुद सोन्याचे दागिने व रोख रकमेबाबत अधिक विचारपुस करता संशयीतांनी काही दिवसांपूर्वी पिंपळवाडी रोड,शिर्डी,ता.राहाता व हॉटेल शितल समोर, येवला रोड, ता.कोपरगांव येथील महिलांच्या गळ्यातील चोरी केलेले सोन्याचे दागिने असुन विक्री करीता आलो असल्याचे सांगितले.
आरोपीने दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने अहमदनगर जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी करता चेन स्नौचिंगचे २ गुन्हे उघडकीस आलेले आहेत.चारही आरोपीचे कब्जातून ३.५००০०/- रुपये किंमतीचे ५० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, ३.५०,০০০/- रुपये किमतीचे ५० ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र, ७५,०००/-रुपये रोख व १,२५,०००/-रुपये किमतीची यमाहा एफझेड एक्स मोटार सायकल व १,००,०००/- रुपये किंमतीची विना नंबर होंडा युनिकॉर्न मोटार सायकल असा एकुण १०,००,०००/- रुपये किमतीचा मुद्देमालासह ताब्यात घेवुन शिर्डी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.वैभव कलूबर्मे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर,श्री. शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी,शिर्डी विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.