Maharashtra247

अवैध गॅस रिफीलींग सेंटरवर तोफखाना पोलिसांचा छापा तब्बल ५३ गॅस टाक्या जप्त;४ लाख १६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

 

अहमदनगर (दि.११ जुलै):-उपनगरातील वैदुवाडी येथील अवैध गॅस रिफीलींग सेंटरवर तोफखाना पोलिसांनी छापा टाकत ५३ गॅस टाक्यासह ४ लाख १६ हजार २००/रू.मुद्देमाल जप्त केला आहे.बातमीच्या हकीकत अशी की तोफखाना पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री.आनंद कोकरे यांना बातमी मिळाली की,वैदुवाडी येथे एका घराचे आडोश्याला पत्र्याचे शेडमध्ये इसम नामे काळू मारुती शिंदे हा बेकायदेशीर रित्या शासनाचा कोणताही परवाना नसतांना एच.पी व भारत गॅस कंपनीच्या डोमेस्टीक व कमर्शीअल गॅस टाक्या जवळ बाळगून लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल अशा प्रकारे गॅस टाकीतुन गॅस काढुन तो एल.पी.जी ऑटो रिक्षामध्ये अनधिकृत रित्या रिफिलींग करीत आहे.

अशी बातमी मिळाल्याने सदर बातमी पोलीस निरीक्षक श्री. कोकरे यांनी तोफखाना पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना बोलावुन त्यांना सदर बातमी प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश दिले.त्यानंतर गुन्हे शोध पथकाने बातमी प्रमाणे खात्री केली असता,काळु शिंदे याच्या राहत्या घराच्या भिंतीच्या आडोशाला,वैदुवाडी येथे छापा टाकुन इसम नामे काळू मारुती शिंदे (रा वैदुवाडी) याचे कब्जातुन ४ लाख १६ हजार २००/-रु.किंमतीच्या एकुण ५३ गॅस टाक्या त्यामध्ये भारत गॅस, हिंदुस्थान गॅस कंपनीच्या घरगुती व व्यापारी वापराच्या गॅस टाक्या,तीन इलेक्ट्रिक मोटर त्यास गॅस रिप्लींग करीता लावलेले मशिन,त्यास दोन पाईप त्याचे तोंडाला नोझल जोडलेले असा मुद्देमाल जप्त करण्यात येवुन पो.कॉ.सतिष साहेबराव त्रिभुवन यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस स्टेशन येथे गु.र.नं ७८३/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८७,२८८,१२५ सह जिवनावश्यक वस्तु कायदा १९९५ चे कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पो.हे.कॉ.प्रदिप बडे हे करत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अमोल भारती यांचे सुचना मार्गदर्शनाखालील पोनिश्री/आनंद कोकरे यांच्या पथकातील पो.उप निरी.श्री.शैलेश पाटील, पोहेका.दत्तात्रय जपे, सुनिल शिरसाट,दिनेश मोरे,वसिम पठाण, भानुदास खेडकर, अहमद इनामदार,सुधीर खाडे,संदिप धामणे, सुरज वाबळे,सतीष त्रिभुवन,सतीष भवर, दत्तात्रय कोतकर,शिरीष तरटे,सुमीत गवळी, बाळासाहेब भापसे यांनी केली आहे.

You cannot copy content of this page