Maharashtra247

माळीवाडा महालक्ष्मी देवस्थानच्या अध्यक्षपदी उमेश साठे यांची निवड 

 

अहमदनगर (दि.१७ जुलै):-आषाढी एकादशीचे औचित्य साधून मातंग समाज पंच समिती महालक्ष्मी देवस्थान ट्रस्टच्या वतीने समाजाची मीटिंग संपन्न झाली.

यावेळी आषाढी एकादशी झाल्यानंतर महालक्ष्मी मातेच्या यात्रा उत्सवला सुरुवात होते या अनुषंगाने महालक्ष्मी देवस्थान येथे भाविक भक्तांची मोठ्या संख्येने दर्शनासाठी भाविक नैवेद्य करतात.यात्रा उत्सवाला सुरुवात होते.यावेळी मातंग समाज पंच कमिटीच्या मीटिंगमध्ये ठराव घेण्यात आला त्यामध्ये सर्वांनी एक मताने अक्टिव्ह मराठी न्यूजचे संपादक उमेश साठे यांची महालक्ष्मी देवस्थान अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

महालक्ष्मी देवस्थानचे मुख्य भगत देवीचे पुजारी पोपटराव साठे यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष.डी.जी.साठे यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष उमेश साठे यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी देवस्थानचे विश्वस्त बाळासाहेब साठे, मच्छिंद्र साठे,रंजीत पारदे,भीमबाबा लोखंडे, प्रेमनाथ महाराज,गोरक्ष विधाते,कृष्ण पठारे, सागर राजगुरू,पप्पू पारधे व देवस्थानचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

उमेश साठे यांची माळीवाडा महालक्ष्मी देवस्थानच्या वतीने व मातंग समाज पंच कमिटीच्या वतीने पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या त्यांच्या निवडीने सर्वत्र अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page