साकुर (दि.१७ जुलै):- पंढरीची वारकरी..उन्ह पावसाची चिंता कोण करी…असे म्हणत लाखो विठ्ठल भक्त वारकरी पंढरपूरच्या विठ्ठलाला भेट देतात.जो वारकऱ्यांचा समूह मिळून वारीला जातो त्याला दिंडी म्हणून ओळखले जाते.वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे.संगमनेर तालुक्यातील सकुर येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळा येथे आषाढी एकादशी निमित्त वारकरी संस्कृतीचे परिचय व परंपरा यांचे संस्कार विद्यार्थ्यावर होण्यासाठी पारंपारिक दिंडी उपक्रमाचे आयोजन थाटात करण्यात आले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाचा पोशाख, विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा,पालखीचे नियोजन वृक्षदिंडी,ग्रंथ दिंडी,रिंगण सोहळा फुगड्या तसेच भजन -कीर्तन या उपक्रमांचा समावेश करण्यात आला.टाळ,मृदंगच्या गजरात या अनोख्या बालगोपाळाच्या दिंडीचा मार्ग साकुर आश्रम शाळा ते गावतळ मार्गे बिरोबाचे मंदिर असा होता.याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पांडुरंग भुतांबरे हे सपत्नीक उपस्थित होते.सर्व ग्रामस्थ व परिसरातील पालक यांनी दिंडीचे दर्शन घेतले.या अनोख्या दिंडीचे सर्वांनी गोड कौतुक केले.
सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे माध्यमिक मुख्याध्यापक शिवराज कदम,प्राथमिक मुख्याध्यापक सुनील खेडकर यांनी मार्गदर्शन केले.दिंडी उपक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रियंका जठार यांनी केले.रेवती तिखे,लता तांबे,अर्चना कदम,अशोक महारनोर,पोपट गोसावी , युवराज काळे,राकेश गायकवाड,सुरेखा हासे,उमाजी वाळुंज,निवृत्ती लेंडे,स्वप्नील हासे,हिरामण जाधव तसेच सर्व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दिंडीची सांगता पालखीच्या पूजनाने व विठ्ठल रुक्मिणीच्या आरतीने सर्वांना बिस्किट व लाह्यांचा प्रसाद वाटप करून झाले.यावेळी सामुदायिक पसायदान ही घेण्यात आले.