वर्दीतला देव…समाजकार्याची दखल घेत महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटने कडून पोलीस उपनिरीक्षक जगदीश मोकळ यांना कृतज्ञता पत्र प्रदान…
अहमदनगर प्रतिनिधी:-पोलीस म्हंटल की, आपल्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे खाकी वर्दीतील एक देवमाणूस. होय बरोबर वाचलत तुम्ही देवमाणूसच.उन्ह,वारा,पाऊस अंगावर झेलून सदैव सामान्य जनतेच्या सेवेस तत्पर असतो तो म्हणजे पोलीस होय.तुम्हाला आठवतय का ज्यावेळेस विविध जयंती, मिरवणूका निघतात,मोर्चे निघतात,आंदोलन होतात,त्या वेळेला हाच पोलीस बांधव आपल्या पाठीशी भक्कमपणे उभा असतो.पोलीस म्हटलं की सर्वसामान्य माणसांना एक धक्काच बसतो परंतु सर्वच पोलीस एकसारखे नाही.
त्यात काही वर्दीतील देवदूत ही आहे.अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथील भूमिपुत्र व मुंबईत ठाणे शहर वाहतूक विभाग येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक श्री.जगदीश मारुती मोकळ यांना नुकतेच महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत कृतज्ञता पत्र दिले आहे.नुकतेच त्यांचे महाराष्ट्र पोलीस दलात नोकरीचे ३६ वर्ष पूर्ण झाले असून त्यांनी पोलिसिंग बरोबर महाराष्ट्र पोलीस दलात आपल्या समाजकार्याने एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
त्यांना दिलेल्या कृतज्ञता पत्रात म्हटले आहे की,आपण स्वतःच्या जीवाची व कुटुंबीयांच्या आरोग्याची परवा न करता देशासाठी परिश्रम करून देशाचे रक्षण करीत आहात आपले कार्य उल्लेखनीय असून आपल्या कार्याला आमचा सलाम आपले उल्लेखनीय व निस्वार्थी कार्यासाठी आपणास हे कृतज्ञता पत्र देताना आम्हाला आनंद होतोय व आपला अभिमान वाटतोय…सदरील पत्र आषाढी एकादशीच्या दिवशीच म्हणजेच १७ जुलै २०२४ रोजी श्री. जगदीश मोकळ यांना प्रदान करण्यात आले आहे.
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटने कडून श्री. मोकळ यांना देण्यात आलेल्या कृतज्ञता पत्राने चिंचोली गुरव ग्रामस्थांची मान अधिक उंचावत आहे.चिंचोली गुरव ग्रामस्थांकडून पोलीस उपनिरीक्षक जगदीश मोकळ यांना पुढील समाजकार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.