नगरमध्ये मोहरम विसर्जन मिरवणूक शांततेत
अहमदनगर (दि.१८ जुलै):-अहमदनगर शहरातील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या मोहरम मधील हसन व हुसेन यांच्या सवारीची ‘कत्तलची रात्र’ व विसर्जन मिरवणूक दि.१७ जुलै रोजी शांततेत पार पडली. कत्तलची रात्र मिरवणूक मंगळवारी रात्री बारा वाजता सुरू झाली.
बुधवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास सवारी कोठल्यात पोहचली. त्यानंतर दुपारी बारा वाजता विसर्जन मिरवणूक सुरू झाली. रात्री पावणे नऊनंतर सवारी दिल्लीगेट वेशीबाहेर पडली. कोणताही अनुचित प्रकार न घडल्याने मिरवणूक शांततेत पार पडली.मोचीगल्ली-जुना बाजार-अर्बन बँक रस्ता- आनंदी बाजार- कोर्टगल्ली-सबजेल चौक-जुनी महापालिका- पंचपीर चावडी-धरती चौक-हातमपुरा-रामचंद्र खुंट मार्गाने सवार्या सकाळी पुन्हा आपापल्या जागी नेण्यात आल्या.बुधवारी दुपारी 12 वाजता विसर्जन मिरवणुकीला पुन्हा सुरूवात झाली.
दोन्ही सवार्या खेळवत पारंपरिक मार्गाने नेण्यात आल्या.विविध ठिकाणी भाविकांकडून त्यावर फुलांची चादर चढविण्यात आली. सरबताच्या गाड्यांना जुन्या महापालिकेपर्यंत परवानगी देण्यात आली होती.मात्र,ही मिरवणूक रेंगाळली.रात्री पावणे नऊनंतर सवारी दिल्लीगेट वेशीबाहेर पडली.रात्री उशिरा सावेडी गावात सवार्यांचे विसर्जन करण्यात आले.